रणदीप हुड्डा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर रणदीपने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच रणदीप वैयक्तिक कारणांमुळेही अनेकदा चर्चेत असतो. आता रणदीप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रणदीप त्याची गर्लफ्रेंड लीन लैशरामबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. रणदीप आणि लीन यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.

हेही वाचा- Video: शाहरुख खानच्या लेकीच्या डान्सने वेधलं लक्ष; अफेअरच्या चर्चेदरम्यान अगस्त्य नंदाबरोबर सुहानाचा रोमँटिक डान्स

रणदीपने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. येत्या २९ नोव्हेंबरला रणदीप आणि लिन मणीपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. महाभारतात अर्जूनने राजकुमारी चित्रगंधाबरोबर ज्या ठिकाणी विवाह केला त्याच ठिकाणी रणदीप त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर सात फेरे घेणार आहे. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर रणदीप मुंबईमध्ये रिसेप्शन देणार आहे.

रणदीप आणि लीन या दोघांनीही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. २०२१ मध्ये रणदीपनं त्याची प्रेयसी लीनबरोबरच्या नात्याबाबत कबुली दिली होती. लीनच्या वाढदिवसाच्या दिवशीही रणदीपनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा- लग्नानंतरही पीयूष मिश्रा यांचे होते इतर स्त्रियांशी संबंध; पत्नीजवळ कबुली दिल्यावर अभिनेत्याला वाटलं की…

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर लवकरच त्याचा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. अभिनयाबरोबरच रणदीपने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केलं आहे. तसेच रणदीप सैयद अहमद अफजलच्या ‘लाल रंग २: खून चुसवा’ चित्रपटात दिसणार आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाल रंग’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.