बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या खूप चर्चेत आहे. गेल्याच महिन्यात २९ नोव्हेंबरला रणदीपने त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामबरोबर लग्नगाठ बांधली. मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार रणदीप व लिनचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर रणदीप लिनबरोबर मुंबईत दाखल झाला आहे. मुंबई विमानतळावरचे दोघांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा- “मला तुमचे बूट चाटायचे…” ‘अ‍ॅनिमल’पाहून राम गोपाल वर्मा यांनी खास शैलीत केलं रणबीर व संदीप यांचं कौतुक

आता लग्नानंतर रणदीप मुंबईमध्ये मोठी रिसेप्शन पार्टी देणार असल्याची चर्चा सुरू होती. आता या रिसेप्शन पार्टीची तारीख समोर आली आहे. येत्या ११ डिसेंबरला रणदीप आणि लिन मुंबईत आपल्या लग्नाची रिसेप्शन पार्टी देणार आहेत. या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रणदीपने लिनबरोबरच्या नात्याची पुष्टी केली होती. सोशल मीडियावर लिनबरोबरचे फोटो शेअर करत रणदीपने प्रेमाची कबुली दिली होती. रणदीप हुड्डाची पत्नी लिन मुळची मणिपूरमधील इंफाळ येथील आहे. अभिनेत्रीबरोबरच लिन मॉडेलिंगही करते. लिनने अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे. शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या माध्यमातून लिनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘जाने जान’, ‘रंगून’, ‘मटरू की बिजली का मंडोला’, ‘हॅट्रिक’ चित्रपटांमध्येही लिन झळकली आहे.

हेही वाचा- ‘सिंघम अगेन’च्या सेटवर अपघात; अ‍ॅक्शन सीन करताना अजय देवगणच्या डोळ्याला झाली दुखापत

रणदीप हुडाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर रणदीप लवकरच त्याच्या आगामी ‘सार्जंट’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.