रणदीप हुड्डा त्याच्या अनोख्या भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरबजीत’मधली त्याची भूमिका प्रचंड गाजली होती. सरबजीत सिंगची भूमिका साकारण्यासाठी रणदीपने चक्क २८ दिवसांमध्ये २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं होतं. खऱ्या सरबजीतसारखं दिसण्यासाठी रणदीपने अक्षरशः स्वत:ला उपाशी ठेवलं होतं.

आता रणदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करून पुन्हा एकदा चाहत्यांना धक्का दिला आहे. “काळं पाणी” असे कॅप्शन या फोटोला रणदीपने दिले आहे. रणदीपचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०२२ पासून त्याने या परिवर्तनाची सुरुवात केली होती.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

रणदीपचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “काय माणूस आहे हा. प्रत्येक भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो.” तर दुसऱ्याने लिहिले, “वीर सावरकर कोणत्या परिस्थितीतून गेले हे दाखवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, तुमच्यासाठी खूप आदर आहे.”

हेही वाचा… विकी कौशलच्या आईला आवडते सूनबाईची ‘ही’ सवय; अभिनेता म्हणाला, “जेव्हा कतरिना घरी…”

गोव्यात झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) एएनआयशी (ANI) संवाद साधताना रणदीपने सांगितलं होतं की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या एका प्रोजेक्टसाठी सध्या त्याने वजन कमी केले आहे. “माझे आता खूप दिवसांपासून वजन कमी आहे आणि मला हे मान्य आहे की फार काळ असे कमी वजन मी ठेवायला नको. परंतु, विनायक दामोदर सावरकरांवरील बायोपिक करण्यासाठी मी माझी मर्यादा वाढवली आहे आणि मी साकारत असलेल्या पात्राला न्याय देण्यासाठी शक्य तेवढं सर्व करायच्या प्रयत्नात असतो. मला भूमिकेतील व्यक्तिरेखा जगायला आवडतात. अशा प्रकारच्या परिवर्तनामुळे मला ती व्यक्तिरेखा अधिक जवळची वाटते.”

हेही वाचा… सुहाना खानचा बाथटबमधील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “रमजान सुरू आहे, जरा तरी लाज…”

दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा याने केली आहे. रणदीप यात वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री अंकिता लोखंडे वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.