एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीचे नाव आवर्जुन घेतले जाते. गेल्या काही वर्षात ती फार कमी चित्रपटात झळकली आहे. त्यातील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केलेली नाही. मात्र आता लवकरच राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून राणीने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. नंतर तिने ‘गुलाम’सारख्या सुपरहीट चित्रपटातही काम केलं, पण तिला कायमच तिच्या आवाजावरुन फारच टोमणे मारले जायचे. तिचा आवाज सॉफ्ट नसून पुरुषी आहे अशी टीका बऱ्याच लोकांनी केली. यामुळे तिच्या सुरुवातीच्या काही चित्रपटातील तिचे डायलॉग दुसऱ्या व्यक्तीच्या अवजात डब केले जायचे. कालांतराने राणीने स्वतःच स्वतःचे डायलॉग डब करायचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : सेल्फी काढणाऱ्या चाहत्याकडे राखी सावंतने निरखून पाहिलं; अन् म्हणाली, “हा आदिलचा भाऊ…”

नुकतंच ‘पिंकव्हीला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राणीने याबद्दल भाष्य केलं आहे. “जर मी लोकांचं म्हणणं ऐकलं असतं तर आज जी लाखो लोक माझ्या आवाजावर प्रेम करतायत त्यांच्यापर्यंत मी पोहोचलेच नसते. आज मला माझ्या खास वेगळ्या आवाजासाठी ओळखलं जातं. माझा आवाज एवढा खास आणि लोकप्रिय बनेल याची कुणीही कल्पना केली नव्हती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणीने ‘कुछ कुछ होता है’, ‘साथीया’, ‘बंटी और बबली’, ‘मर्दानी’, ‘हीचकी’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. राणीचा आगामी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.