नावेद शेख, ज्याला सध्याचे जेन झी म्हणजेच पुढील पिढी नेझी म्हणून ओळखतात. नेझी एक रॅपर आहे अन् त्याच्याच जीवनावरून प्रेरित ‘गली बॉय’ हा चित्रपट झोया अख्तरने सादर केला होता. अलीकडेच नेझीने Vh1 सुपरसोनिक संगीत महोत्सवात एक दमदार परफॉर्मन्सही दिला. यावेळी त्यांनी मीडियाशीही संवाद साधला. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्याने ‘गली बॉय’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या संघर्ष, यश आणि जीवनाबद्दल चर्चा होऊ लागल्याचे स्पष्ट केले.

याबरोबरच या चित्रपटात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्याच्या खऱ्या आयुष्यात कधीच घडल्या नाहीत त्याबद्दलही नेझीने भाष्य केलं आहे. चित्रपटात मुराद या मुख्य पात्राच्या वडिलांच्या दोन बायका असल्याचं दाखवण्यात आलं आहे जे धादांत खोटं असल्याचा दावा नेझीने या मुलाखतीदरम्यान केला आहे.

Liquor license also in the name of Mahayuti candidate Sandipan Bhumre wife
भुमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार

आणखी वाचा : हृतिक रोशनने नाकारलेली भूमिका अन्.., ‘मैं हूं ना’च्या कास्टिंगमध्ये आलेल्या आव्हानांबद्दल फराह खान स्पष्टच बोलली

नेझीच्या आई आणि वडिलांनी हा चित्रपट पाहिला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना नेझी म्हणाला, “माझ्या आई वडिलांनी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, कारण हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक होता. ज्या गोष्टी कधी घडल्याचा नाहीत त्या या चित्रपटात दाखवल्या गेल्या. चित्रपटात माझ्या वडिलांच्या दोन पत्नी असल्याचं दाखवलं गेलं अन् माझेदेखील दोन मुलींशी संबंध आहेत असंही दाखवलं गेलं. हे सगळं काल्पनिक आहे. माझे आई वडील हे आजही एकत्र आहेत अन् मीदेखील कधीच दोन रिलेशनशिपमध्ये नव्हतो. मी त्या तऱ्हेचा माणूस नाही.”

पुढे नेझी म्हणाला, “चित्रपटात मी आयपॅडवर गाणी तयार करताना दिसतोय या आणि अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी खऱ्या आहेत, तसेच मी एका मुस्लिम कुटुंबातून येतो हेदेखील चित्रपटात दाखवलं आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की चित्रपटातील सगळ्याच गोष्टींवर प्रेक्षकांनी विश्वास ठेवू नये. ‘गली बॉय’मुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही बदल घडले. माझ्या खासगी आयुष्यातील घटनांशी छेडछाड करून त्यांनी ही कहाणी सादर केली ज्याचे मला फार वाईट वाटते, पण व्यवसायच्या दृष्टीने ती गोष्ट फायदेशीर ठरली हे मात्र खरं आहे.”

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, अमृता सुभाष, विजय राज, विजय वर्मा, सिद्धांत चतुवेर्दी हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. इतकंच नव्हे तर हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर याला प्रचंड यश मिळालं अन् लोकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला.