‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर अभिनेता रणबीर कपूर नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो आता ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटात तो दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच तिने तिचा रणबीरबरोबर शूटिंग करण्याचा अनुभव शेअर केला. यात रणबीरचा सेटवरीला वावर कसा असतो याबरोबरच अनेक गोष्टींचा खुलासा तिने केला आहे. हे सांगताना तिने स्वतःची रणबीरशी तुलनाही केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच होणार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात टक्कर, जाणून घ्या कारण

रश्मिका मंदानाने एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरबरोबर ‘अॅनिमल’ चित्रपटात काम करताना कसे वाटले हे सांगितले. रश्मिका मंदाना म्हणाली, ‘रणबीर सर्व महिलांची खूप काळजी घेतो. तो खरा जेंटलमॅन आहे. तो एक अतिशय साधा माणूस आहे, जो सर्वांशी खूप छान बोलतो.” रणबीरबद्दल आणखीन काही गोष्टींचा खुलासा केला.

रणबीर कपूर खूप खोडकर आहे असे अनेकांना वाटते. पण रणबीर खरंच खोडकर की नाही या रश्मिकाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ती रणबीरशी स्वतःची तुलना करत म्हणाली, “मी त्याच्यापेक्षा खूप खोडकर आणि मस्तीखोर आहे, त्यामुळे तो खोडकर आहे असं मी अजिबात म्हणू शकत नाही. मी लोकांना सर्वात जास्त त्रास देते. त्या मानाने रणबीर समोरच्या व्यक्तीला इतका त्रास देत नाही.” ‘अ‍ॅनिमल’च्या शूटिंगदरम्यान तिने रणबीर कपूरसोबत खूप चांगला वेळ आणि बाँड शेअर केल्याचे तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. तिच्या या उत्तराची सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा : रणबीर कपूरच्या ‘त्या’ कृतीमुळे सेटवरच रडू लागली रश्मिका मंदाना, म्हणाली, “मी तुझ्याइतकी…”

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर आणि रश्मिका यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna made comparison between her and ranbir kapoor rnv
First published on: 14-10-2022 at 14:04 IST