‘गुड बाय’ चित्रपटामधून अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिचा हा पहिलाच हिंदी चित्रपट. बॉलिवूड पदार्पणामध्येच रश्मिकाला बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच ती व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच रश्मिकाने आपल्या याआधीच्या चित्रपटामधील बोल्ड सीनबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बोल्ड सीनबाबत काय म्हणाली रश्मिका मंदाना?
२०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डियर कॉमरेड’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये रश्मिकाने विजय देवरकोंडाबरोबर काम केलं. या चित्रपटामध्ये विजयबरोबर तिचा किसिंग सीन होता. पण या सीननंतर तिला ट्रोलिंगचा अधिक सामना करावा लागला. एका बोल्ड सीनमुळे आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोर जावं लागलं हे रश्मिकाने सांगितलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, “‘डियर कॉमरेड’ चित्रपटासाठी बोल्ड सीन चित्रीत केल्यानंतरचा काळ माझ्यासाठी खूप वेदनादायी होता. सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे असंच मला यावेळी वाटायचं. अंथरुणामध्ये मी पडून राहायचे. सतत रडायचे. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता.”

आणखी वाचा – डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिकाला या बोल्ड सीननंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला पण तिने यामधून स्वतःला सावरलं. आता रश्मिका-विजय एकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं जातं. पण अद्यापही दोघांनी याबाबत कोणतंच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये विजयला रश्मिकाबरोबरच्या नात्याबाबत विचारता ती माझी चांगली मैत्रिण असल्याचं त्याने म्हटलं होतं.