Raveena Tandon Slams Airline Staff : श्रद्धा कपूर ही लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आहे. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यासह श्रद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते. तसेच ती चाहत्यांच्या कमेंट्सना उत्तरंही देत असते, त्यामुळे प्रेक्षक तिच्याशी लवकर कनेक्ट होतात.
श्रद्धा तिच्या साध्या वागण्यामुळे प्रेक्षकांची लाडकी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री वेगळे कारणाने चर्चेत आहे. ते म्हणजे तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ. अभिनेत्रीने तिचा एक गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला होता. याला तिने भन्नाट कॅप्शही दिलं होतं. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली होती. तर याच व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड राहुल मोदीसुद्धा दिसत होता.
श्रद्धा तिच्या बॉयफ्रेंडसह यापूर्वी बरेचदा सार्वजनिकरित्या दिसते. यावर्षी मार्च महिन्यात अभिनेत्री तिच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड राहुल मोदीसह खास सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर गेली होती, अशीही चर्चा झाली होती. श्रद्धा व राहुल एकत्र विमानातून प्रवास करत असताना तेथील विमानातील क्रू मेंबर्सनी हे दोघे एकमेकांशी गप्पा मारत असताना त्यांच्या नकळत त्यांचे फोटो काढले होते. तेव्हा त्यांचे फोटो खूप व्हायरलही झाले होते.
अभिनेत्री रवीना टंडनने आता यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. रवीनाने श्रद्धा राहुलचे त्यांच्या नकळत काढलेले फोटो पाहिल्यानंतर क्रू मेंबर्सना सदस्यांना सुनावलं आहे. ती म्हणाली, “क्रू मेंबर्सने या जोडीच्या गोपनीयतेचे उल्लंघन केलं आहे. त्यांच्याकडून अशी कृती अपेक्षित नाही.”
श्रद्धा आणि राहुल गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. हे दोघे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या प्री वेडिंगसाठी एकत्र जामनगरला जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते.