बॉलीवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा व अमिताभ यांच्या अफेअरची आजही चर्चा होते. रेखा व अमिताभ कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर येणं, एकमेकांशी बोलणं टाळतात. पण रेखा मात्र अमिताभ यांच्या कुटुंबाला नेहमी खूप प्रेमाने, आदराने भेटतात. रेखा यांचा अभिषेक बच्चनबरोबरचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

रेखा व अभिषेक बच्चन यांची भेट मुंबईतील एचटी स्टाइल अवॉर्ड्सच्या मंचावर झाली. इथे रेखा यांनी अभिषेकला पाहिलं आणि त्याला प्रेमाने मिठी मारली. तसेच दोघेही काही वेळ एकमेकांशी बोलले. त्या दोघांच्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

खरं तर रेखा आधीच स्टेजवर हजर होत्या आणि सर्वात आधी अक्षय कुमार स्टेजवर येतो. मात्र अक्षय आणि रेखा यांनी एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दोघांनीही एकमेकांना ‘हाय, हॅलो’ सुद्धा म्हटलं नाही. पण काही वेळाने अभिषेक बच्चन स्टेजवर येतो तेव्हा रेखा स्वत: पुढे येऊन अभिषेकला मिठी मारतात आणि नंतर ते दोघेही संवाद साधताना दिसतात.

अभिषेक बच्चनने ज्या पद्धतीने रेखा यांची आदराने भेट घेतली, ते पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. तसेच अक्षय कुमार आणि रेखा यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. तर, त्याचं कारण म्हणजे ९० च्या दशकात रेखा यांचं नाव अक्षय कुमारबरोबर जोडलं गेलं होतं. रेखामुळेच रवीना व अक्षय यांचं ब्रेकअप झालं होतं, अशी चर्चाही झाली होती. मात्र आजपर्यंत कधीच अक्षय कुमार, रवीना टंडन किंवा रेखा याबद्दल काहीच बोलले नाहीत.

जेव्हा अक्षय कुमार व शिल्पा शेट्टी समोरासमोर येतात

दरम्यान, या अवॉर्ड शोमध्ये अक्षय कुमार व शिल्पा शेट्टी तब्बल ३१ वर्षांनी समोरासमोर आले. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या १९९४ साली आलेल्या चित्रपटातील ‘चुरा के दिल मेरा गोरिया चली’ या गाण्यावर डान्स केला. दोघांनी पांढऱ्या रंगाचे आउटफिट घातले होते. मंचावर ते त्यांच्या एव्हरग्रीन गाण्यावर थिरकले. त्यांच्या या डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेखा यांनी पुरस्कार मिळाल्यावर तिसऱ्या पिढीतील कलाकारांचं कौतुक केलं. त्यांनी आपला स्टाईल अवॉर्ड जान्हवी कपूरला समर्पित केला. “तिसऱ्या पिढीतील सर्व अभिनेते, तंत्रज्ञ, फॅशन डिझायनर इतके चांगले काम करत आहेत, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतेय, त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. मी माझा पुरस्कार या सर्वांना समर्पित करू इच्छिते, तसेच मी हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खुशी जान्हवी कपूरला समर्पित करतेय,” असं रेखा म्हणाल्या.