ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सध्या त्यांच्याबद्दलच्या एका दाव्यामुळे चर्चेत आहेत. यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या बायोग्राफीमध्ये अभिनेत्री रेखा त्यांची सेक्रेटरी फरझानाबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी फक्त फरझानालाच आहे, असंही त्या पुस्तकात नमूद केलंय. या पुस्तकातील दाव्यांची चर्चा होत असतानाच रेखा यांचं जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल होत आहे.
रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेले राहिले. त्यांनी दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं, परंतु लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती. पतीच्या निधनानंतर रेखा यांनी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सिमीने रेखाला पुन्हा लग्न करणार का? असं विचारलं होतं. या प्रश्नावर रेखाच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. रेखा म्हणाल्या होत्या, “तुला एखाद्या पुरुषाशी म्हणायचं आहे का?” यावर सिमी म्हणाली, “जाहीरपणे स्त्री नक्कीच नाही.” यावर रेखा यांनी उत्तर दिलं, “का नाही?” त्यानंतर त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या मनात, मी स्वतःशी, माझ्या व्यवसायाशी आणि माझ्या प्रिय व्यक्तीशी लग्न केले आहे. मी वेडी नाही.”
“डॉक्युमेंट्सवर कोणतंही नाव असलं तरी मनात…”, गश्मीर महाजनीची जुनी पोस्ट व्हायरल; म्हणालेला…
पुढे सिमी म्हणाली होती की केवळ पुरुषच महिलेला सुरक्षा देऊ शकतो. यावर रेखा तिला अडवते आणि म्हणते, “त्याचा पुरुषाशी काहीही संबंध नाही. हे सर्व ती कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून आहे”. या मुलाखतीत सिमीने रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करतेस का, असा प्रश्नही विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या. “होय. हा एक मूर्खपणाचा प्रश्न आहे. आजपर्यंत मला असा एकही पुरुष, स्त्री, मूल, म्हातारा सापडलेला नाही जो त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत नाही. मग मी कशी त्यांच्यावर प्रेम करत नसेन”.
साखरपुडा झाला, लग्न कधी करणार? स्वानंदी टिकेकर म्हणाली, “आमच्या आयुष्यातील एका…”
दरम्यान, “फरझाना रेखाच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि घरात येण्याऱ्या-जाण्यावर नियंत्रण ठेवते. ती एक उत्तम गेटकिपर आहे आणि रेखाच्या आयुष्यातील प्रत्येक फोन कॉलवर तिचं लक्ष असतं, असं म्हटलं जातं. रेखाने स्वतःच्या आयुष्यातील गूढ कायम ठेवलंय. यात फरझाना तिला मदत करते,” असा दावाही रेखा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकात करण्यात आला आहे.