Bollywood Actress Talks About Her Daughter : आई होणं म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच असतो असं म्हटलं जातं. यामुळे त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. अशातच एका लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीने नुकतीच तिच्या आई होण्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. परंतु, मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या मनात भीती निर्माण झाल्याचं तिने म्हटलं आहे.
बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तसेच वेब सीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री रिचा चड्डाने याबाबतचा तिचा अनुभव सांगितला आहे. रिचाने लीली सिंहला मुलाखत दिली आहे. यामध्ये ती म्हणाली, “मला थोडी भीती वाटत होती. जगात खूप काही चुकीचं घडत असतं, त्यामुळे मूल जन्माला घालणं योग्य निर्णय आहे की नाही याबाबत साशंक होते”.
रिचा पुढे म्हणाली, “तुमच्यावर एका मुलाची जबाबदारी असते. तुम्हाला त्या मुलाच्या निदान सहा महिन्याच्या आहाराची तरी काळजी घ्यावीच लागते आणि ते एक मोठं आव्हान असतं. मला तरी सुरुवातीला भीती वाटत होती. मला वाटलेलं माझं आयुष्य संपलं.”
रिचा चड्डाने मुलीच्या जन्मानंतर भीती आणखी वाढली असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “माझं असं झालं की, आपण भारतात राहतो, मला एक बंदूक घ्यावी लागेल”. हे ती विनोद करत म्हणाली. पुढे अभिनेत्री म्हणाली, “नंतर मी म्हटलं, बघता येईल, आम्ही तिला खूप खंबीर बनवू.”
रिचा चड्डा व अली फजल यांच्या मुलीचा गेल्या वर्षी १६ जुलैला जन्म झाला. त्यावेळी या जोडीने सोशल मीडियामार्फत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली होती. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव झुनेयरा असं ठेवलं आहे.
दरम्यान, रिचा चड्डाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यासाठी तिला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. यासह तिने, ‘मसान’, ‘फुक्रे मालिका’, ‘पंगा’ आणि ‘सेक्शन ३७५’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ वेब सीरिजमध्येही झळकली होती.