अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. येत्या १२ जुलैला हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच अनंत-राधिकाचा संगीत सोहळा थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. रणबीर-आलिया, सलमान खान, अर्जुन कपूर, जान्हवी-खुशी, सारा अली खान, अनन्या पांडे, ओरी यांनी या सोहळ्यात खास डान्स परफॉर्मन्स सादर केले. सध्या अनंत-राधिकाच्या संगीतमधील अनेक Inside व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच सोशल मीडियावर आणखी एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अंबानींच्या संगीत सोहळ्याला बॉलीवूडचे दादा-वहिनी जिनिलीया व रितेश देशमुख तसेच धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या पतीसह उपस्थिती लावली होती. या दोन्ही जोडप्यांची रेड कार्पेटवर एका मागोमाग एक अशी एन्ट्री झाली. सर्वात आधी रितेश-जिनिलीयाने पापाराझींसमोर एकत्र पोज देत सर्वांना अभिवादन केलं. यावेळी जिनिलीयाने शेवाळी रंगाचा सुंदर असा गाऊन ड्रेस आणि रितेशने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते.

हेही वाचा : ४९ वर्षांच्या ऐश्वर्या नारकरांनी डॅशिंग अंदाजात चालवली ‘थार’; शेजारी बसले पती अविनाश, व्हिडीओ व्हायरल

रितेश-जिनिलीया सर्वांना अभिवादन करून अनंत-राधिकाच्या संगीत पार्टीला आतमध्ये जाणार इतक्यात रेड कार्पेटवर त्यांच्या मागोमाग अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची एन्ट्री झाली. धकधक गर्लला पाहताचा कसलाही विचार न करता रितेशने तिला सर्वांसमोर वाकून नमस्कार केला. अभिनेत्याची ही कृती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. माधुरीला एकेकाळी ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखलं जायचं. तिची लोकप्रियता आजही कायम आहे. याचा मान राखत रितेशने सर्वांसमोर तिला अभिवादन केलं. त्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

रितेशचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “रितेश खरंच माणूस म्हणून खूप चांगला आहे”, “त्याचे संस्कार नेहमी दिसतात”, “रितेश नेहमीच मोठ्यांचा आदर करतो”, “रितेश-जिनिलीया दोघंही सर्वांसाठी आदर्श आहेत”, “ही दोन्ही जोडपी खूपच सुंदर आहेत”, “रितेशकडे हे संस्कार बाबांमुळे आले आहेत”, “चौघंही सुंदर दिसत आहेत” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये रितेश देशमुखवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “धनाढ्य कुटुंबातील…”, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याची मराठी अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला, “मला माझ्या छोट्या…”

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट येत्या १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या सोहळ्याला देश व विदेशातून असंख्य पाहुणे उपस्थित राहणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाचे विधी १४ जुलैपर्यंत असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या भव्य विवाहसोहळ्याकडे लागलं आहे.