Deol Family Reached at Hospital to Meet Dharmendra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते मागील १२ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहते व सेलिब्रिटी काळजी व्यक्त करत आहेत. रितेश देशमुखने धर्मेंद्र लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.
रितेश देशमुख व त्याची पत्नी जिनिलीया या दोघांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी रितेशला धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विचारण्यात आलं. “त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतोय. ते लवकरात लवकर बरे व्हावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना,” असं रितेश देशमुख म्हणाला.
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरल्यानंतर संपूर्ण देओल कुटुंब ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचलं आहे. सनी देओल, बॉबी देओल, करण देओल, हेमा मालिनी व ईशा देओल धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात आहेत.
पाहा व्हिडीओ
धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर हेमा मालिनी व ईशा देओल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे अत्यंत अपमानास्पद आहे. उपचारांना प्रतिसाद देऊन बरं होणाऱ्या धर्मेंद्र यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणं अक्षम्य असल्याचं हेमा मालिनी म्हणाल्या. तर धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे, असं ईशा देओलने म्हटलंय.
८९ वर्षांचे धर्मेंद्र मागील १२ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सलमान खान, शाहरुख खान, अमीषा पटेल, गोविंदा, आर्यन खान यांनी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांची भेट घेतली आहे.
