रितेश आणि जिनिलीया देशमुख यांची जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनीही २०१२ मध्ये लग्न केले. रितेशला प्रत्येक गोष्टीत जिनिलीयाने खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे बायकोच्या वाढदिवसानिमित्त रितेशने खास रोमॅंटिक फोटो शेअर करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : “सोशल मीडियावर १०० लोकांचे…”, लेकीला ट्रोल करणाऱ्यांवर काजोल संतापली; म्हणाली, “निर्दयीपणे…”

जिनिलीया देशमुख आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. बायकोच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुख खास पोस्ट शेअर करत लिहितो, “तू माझी खूप चांगली जिवलग मैत्रीण, माझ्या कठीण काळात मला कायम साथ देणारी माझी सर्वात चांगली सहकारी आहेस. तू मला कायम प्रोत्साहन दिलेस. my everything तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : “आमच्या लाडक्या…”, ‘रॉकी और रानी’पाहून अमृता खानविलकर भारावली, क्षिती जोग आणि रणवीरसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

रितेश या पोस्टमध्ये पुढे लिहितो, “माझे जीवन सुखी आणि समृद्ध केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार… माझी बायको, माझं वेड…लव्ह यू जिनिलीया.” रितेशने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी या फोटोवर कमेंट करत जिनिलीयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Scam 2003 : “मास्टरमाइंड तेलगी अन् ३० हजार कोटींचा घोटाळा…”, ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’चा दमदार टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री जिनिलीया देशमुखने याचवर्षी ‘वेड’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते. याआधी जिनिलीयाने तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्ल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेवटची ती जिओ सिनेमाच्या ‘ट्रायल पीरियड’ या हिंदी चित्रपटामध्ये झळकली आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता.