Saif Ali Khan buys new home: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर जानेवारी महिन्यात त्याच्या घरात एका अनोळखी व्यक्तीकडून चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर तो मोठ्या चर्चेत आला होता. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच त्याने अल्फरदान ग्रुपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. या परिषदेत त्याने कतारमधील दोहा येथे द सेंट रेजिस मार्सा अरेबिया आयलंड द पर्ल येथे मालमत्ता खरेदी केल्याचे उघड केले.

हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी सैफ अली खानचा मोठा निर्णय

त्याबाबत बोलताना अभिनेता म्हणाला की, दुसरे घर किंवा सुट्यांसाठी घर, असा विचार करून हे घर विकत घेतले आहे. ते खूप दूर नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते सुरक्षित आहे. येथे राहायला छान वाटते. पुढे अभिनेता म्हणाला की, मी तिथे कामानिमित्त गेलो होतो. शूटिंग करीत होतो. मला ती प्रॉपर्टी आवडली. तिथे तुमचा खासगीपणादेखील जपता येतो आणि आरामदायीसुद्धा वाटते. विशेष बाब म्हणजे तुम्हाला तुमचा एकांत मिळतो. तिथे शांतता आहे.

लवकरच अभिनेता त्याच्या कुटुंबासह या नवीन घराला भेट देणार आहे. पत्नी करीना कपूर, तैमूर व जेह हे या घराला भेट देण्यासाठी उत्सुक असल्याचे सैफ अली खानने म्हटले. सैफ अली खानचे दोहाबरोबरच लंडन आणि गस्टाडमध्येदेखील घर आहे. तसेच त्याची वांद्र्यामध्ये अपार्टमेंट आहे. तसेच तो अनेकदा त्याच्या हरियाणामधील पतौडी पॅलेसलादेखील भेट देतो.

सैफ अली खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. जानेवारी महिन्यात त्याच्यावर चाकूहल्ला झाल्यानंतर अभिनेता मोठ्या चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने लीलावती रुग्णालयात धाव घेतली होती. उपचारानंतर तो पाच दिवसांनी घरी आला होता. पोलिसांनी त्याच्या हल्लेखोराला पकडले. अभिनेता लवकरच कुकी गुलाटी आणि ‘द ज्वेल थीफ : द हेइस्ट बिगिन्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, सैफ अली खानसह त्याची पत्नी करीना कपूरदेखील बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. त्याची मुले सारा, इब्राहिम, जेह, तैमूरदेखील मोठ्या चर्चेत असतात. इब्राहिम अली खान नुकताच नादानियां हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले. आता