बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात प्रभास श्रीराम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर कृती सेनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. ‘आदिपुरुष’मध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. परंतु, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो सामील होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खान ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सामील होणार नाही. यादरम्यान सैफ पत्नी करीना कपूर व तैमुर, जेह या आपल्या मुलांसह सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जाणार आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा>> मुख्यमंत्र्यांच्या लेकाशी लग्न, वर्षभरातच पतीचं निधन अन्…; किशोर कुमार यांच्याशी दुसऱ्यांदा विवाह करताना सात महिन्यांची गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री

‘आदिपुरुष’ चित्रपटाचं प्रमोशन पुर्णत: प्रभासवर केंद्रीत असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासने ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनसाठी मे महिन्यातील तारखा दिल्या असून त्यानुसार चित्रपटाच्या प्रमोशनचं प्लॅनिंग करण्यात येणार आहे.

हेही वाचा>> एक बेपत्ता मुलगी, २७ महिलांचे खून अन्…; दबंग पोलीस अधिकारी बनून सोनाक्षी सिन्हा उलगडणार मिस्ट्री, ‘दहाड’ वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदिपुरुष’ चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमुळे वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील व्हीएफएक्सवर आक्षेप घेण्यात आला होता. तसंच रावणाच्या भूमिकेत असलेल्या सैफ अली खानला लूकवरुन ट्रोलही करण्यात आलं होतं.