scorecardresearch

“तैमूरला जंक फूड…” सैफ अली खानने लेकाच्या खाण्याच्या सवयींबाबत केला खुलासा

सैफ अली खानने तैमूरच्या सवयींबद्दल केलं भाष्य

“तैमूरला जंक फूड…” सैफ अली खानने लेकाच्या खाण्याच्या सवयींबाबत केला खुलासा
सैफ अली खानने तैमुरच्या सवयीबाबत खुलासा केला आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

बॉलिवूडमधील सैफ अली खान व करीना कपूर हे लोकप्रिय कपल आहे. त्यांना तैमुर व जेह ही दोन मुलं आहेत. तैमूर व जेह हे दोघेही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहेत. अनेकदा तैमूर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतो. तर कित्येकदा तो स्वत: कॅमरेसमोर पोझ देतानाही दिसला आहे.

सैफ अली खानचं हे दुसरं लग्न आहे. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंगपासून सैफला सारा अली खान व इब्राहिम खान ही दोन मुले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने त्याच्या मुलांबद्दल भाष्य केलं आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला “माझ्या मुलांकडे स्वत:ची वेगळी क्षमता व सामर्थ्य आहे”.

हेही वाचा >> दुसऱ्यांदा आई झालेल्या देबिना बॅनर्जीने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, म्हणाली…

हेही वाचा >> “त्याचा नम्रपणा व स्वभाव…” ‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढा यांची विकी कौशलसाठी खास पोस्ट

सैफने या मुलाखतीत सारा खान, इब्राहिम व तैमुरकडून त्याला खूप काही शिकायला मिळालं असंही सांगितलं. तो म्हणाला, “सारा ही अत्यंत नम्र व कुठलाही गर्व नसणारी मुलगी आहे. तिला कोणाचंही मन दुखवायला आवडत नाही. ती अत्यंत शांतपणे संपूर्ण परिस्थिती हाताळते. इब्राहिम कधीच कोणत्याच गोष्टीचा ताण घेत नाही”.

हेही पाहा>> Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

सैफने पुढे त्याचा लाडका लेक तैमूरच्या सवयींबद्दलही खुलासा केला. “तैमूर आता जंक फूड खात नाही. त्याला फळे खाण्यास दिली की जंक फूड किती वाईट आहे, हे तो सांगतो”, असंही सैफ म्हणाला. तैमूर व सैफ गिटार शिकत असल्याचंदेखील त्यांने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 11:56 IST

संबंधित बातम्या