‘द कपिल शर्मा’ शो पुन्हा सुरू झालाय आणि बॉलिवूडकरही चित्रपटांच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावत आहेत. नुकतीच चित्रपट ‘विक्रम वेधा’तील कलाकारांची टीम प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली. सैफ अली खान, राधिका आपटे, रोहित सराफ, शारीब हाश्मी, सत्यदीप मिश्रा, योगिता भयानी आणि दिग्दर्शक जोडी गायत्री-पुष्कर यांचा समावेश होता. या एपिसोडमध्ये कलाकारांनी अनेक खुलासे केले. सैफनेही ‘कल हो ना हो’ मधील त्याचा फोटो आंतरराष्ट्रीय डेटिंग अॅपवर असल्याचा एक किस्सा सांगितला.

‘ये रिश्ता…’मधील अभिनेत्रीची प्रकृती ढासळली; रुग्णालयात दाखल मैत्रिणीला भेटण्यासाठी पोहोचली तारक मेहता फेम सोनू

एपिसोडच्या दरम्यान, कपिल शर्माने सैफ अली खानच्या हाऊस ऑफ पतौडी क्लोदिंग लाइनवरून त्याची मस्करी केली. पतौडी पॅलेसमधील सर्वांनी घातलेले कपडे हाऊस ऑफ पतौडी मार्फत विकले जातात का? असा प्रश्न त्याने विचारला. यावर सैफ नाही म्हणाला, ‘आमच्या इथे सर्व नवीन कपडे मिळतात आणि जे कपडे विकले जात नाहीत, ते मी घालतो,’ असं सैफने सांगितलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

शोच्या शेवटी सर्व कलाकार त्यांच्याबद्दलचे काही किस्से सांगत होते, तेव्हा सैफ म्हणाला, “कोणीतरी माझा ‘कल हो ना हो’ चित्रपटातील फोटो आंतरराष्ट्रीय डेटिंग अॅपवर टाकला होता.” त्यावर अर्चना पूरण सिंगने मस्करीत विचारले की, “सर्वांनी राइट स्वाइप केले होते का?” त्यावर सैफने सांगितले की ‘बरेच लोक माझा फोटो लावून अकाउंट वापरणाऱ्याशी चॅटिंग करत होते. याची बातमीदेखील झाली होती. नंतर लोकांना ते अकाउंट बनावट असल्याचं लक्षात आलं.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विक्रम वेधा चित्रपटाची स्टारकास्ट सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.