Saiyaara actor on Bankruptcy: ‘सैयारा’ हा चित्रपट अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे दिसत आहे. १८ जुलैला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सैयाराने विकी कौशलच्या छावा चित्रपटाला मागे टाकले आहे. सैयाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर ९४ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

अभिनेता काय म्हणाला?

अनित पड्डा व अहान पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या रोमँटिक चित्रपटात अभिनेता राजेश कुमार सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. राजेश कुमारने याआधी साराभाई व्हर्सेस साराभाई या या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याबरोबरच, कोटा फॅक्टरी या वेब सीरीजमधील त्याची भूमिकादेखील प्रचंड गाजली.

आता सैयारा या चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता अभिनेत्याने नुकतीच मेरी सहेलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या यशाबद्दल, कामाबद्दल वक्तव्य केले. त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याचेदेखील सांगितले. अभिनेत्याने काही वर्षांपूर्वी शेतीव्यवसाय करण्यास सुरूवात केली होती. मात्र, अभिनेत्याला मोठा आर्थिक फटका बसला. एक काळ असाही आला, जेव्हा त्याच्या खात्यात फक्त २५०० रुपये होते. त्याच्यावर २ कोटींचे कर्ज होते.

अभिनेता म्हणाला, “मला कुठूनही उत्पन्न मिळत नव्हते. माझे पैसे फक्त जात होते. माझ्यावर दोन कोटींचे कर्ज होते. दिवाळखोरी हा मोठा शब्द आहे. पण, मला खूप काळापर्यंत मी दिवाळखोर असल्यासारखे वाटत होते. मी रोजच्या दैनंदीन गरजांसाठीदेखील पैसे कमावू शकत नव्हतो. मी माझ्या गरजांसाठी माझ्या कुटुंबावर अवलंबून होतो.पण, तो एक काळ होता.

अभिनेत्याने असेही सांगितले की आताच्या काळात कोणीही शेतकरी व्हावे, असा विचार करत नाही. शेतकरी होण्याची कोणी स्वप्ने पाहत नाही. मला लोकांची ती विचारसरणी बदलायची होती. शेती करण्यासाठी २०१९ मध्ये अभिनय सोडला. लॉकडाऊनमध्ये मी माझे साठवलेले पैसे वापरले होते. मी अक्षरश: दिवाळखोर झालो होतो. माझ्या खिशात पैसे नव्हते. कर्ज मात्र खूप होते.

दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणालेला, “मी बिन्नी अँड फॅमिली या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी जेव्हा युकेमध्ये गेलो, त्यावेळी माझ्याकडे २५०० रुपये होते.२४ दिवसांच्या शूटिंगदरम्यान मी दोनदा प्रवास केला. पण, माझ्या मुलांसाठी दोन चॉकलेटसुद्धा खरेदी करू शकलो नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गल्लाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिेता म्हणालेला, “शेतीमुळे मी चांगला अभिनेता होऊ शकलो. आता एखादी भूमिका साकारताना जेव्हा भावनांची गरज असते, तेव्हा मी माझ्या शेती करताना वेळचे दिवस आठवतो आणि माझ्या डोळ्यात अश्रू येतात.

दरम्यान, सैयारा चित्रपट या आठवड्याच्या शेवटी ५०० कोटींचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता आहे.