Saiyaara Box Office Collection Day 3: मागच्या काही महिन्यात अनेक मोठ्या स्टार्सचे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळले. पण सध्या मात्र दोन नवोदित कलाकारांच्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट म्हणजे ‘सैयारा’ होय. अहान पांडे व अनीत पड्डा यांचा ‘सैयारा’ एक रोमँटिक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

‘सैयारा’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. सगळीकडे या चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळतेय. तीन दिवसांत ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तसेच ‘सैयारा’ने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ‘सैयारा’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती, ते जाणून घेऊयात.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘सैयारा’ शुक्रवारी, १८ जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ कोटी रुपयांचे कलेक्शन करत दमदार ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. शनिवारी ‘सैयारा’ने २५ कोटी रुपये कमावले. आता ‘सैयारा’च्या रविवारच्या कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. रविवारी ‘सैयारा’च्या कमाईत मोठी वाढ झाली. ‘सैयारा’ने तिसऱ्या दिवशी तब्बल ३७ कोटी रुपये कमावले आहेत. सिनेमाचे भारतातील कलेक्शन ८३ कोटी रुपये झाले आहे. तर जगभरातील कमाई १०० कोटींहून जास्त झाली आहे.

मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’चं प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. ‘सैयारा’ हा अवघ्या ३ दिवसांत १०० कोटींची कमाई करणारा २०२५ मधील दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी विक्की कौशलच्या ‘छावा’ने तीन दिवसांत १०० कोटींचे कलेक्शन केले होते. सैयारा पहिल्या आठवड्यात १५० कोटींची कमाई करेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

२०२५ मध्ये दमदार ओपनिंग वीकेंड असलेले टॉप १० सिनेमे

  • छावा- १२१.४३ कोटी
  • हाउसफुल 5- ९१.८३ कोटी
  • सिकंदर- ८६.४४ कोटी
  • सैयारा- ८३ कोटी
  • रेड 2- ७३.८३ कोटी
  • स्काय फोर्स- ७३.२ कोटी
  • सितारे जमीन पर- ५७.३ कोटी
  • जाट- ४०.६२ कोटी
  • केसरी चॅप्टर 2- २९.६२ कोटी
  • भूल चूक माफ- २८.७१ कोटी

‘सैयारा’ने २०२५ मध्ये रिलीज झालेल्या अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे. २०२५ मध्ये दमदार ओपनिंग वीकेंड करणाऱ्या टॉप १० सिनेमांच्या यादीत सैयारा पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ‘रेड 2’ ला मागे टाकत सैयारा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सैयारा’चे बजेट ५० कोटी रुपये आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बजेटची रक्कम वसूल केली आहे. मोहित सूरीच्या या सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळतोय. सिनेमात अहान पांडे व अनीत पड्डा यांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे.