सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारसाठी ऑगस्ट महिना मात्र लकी ठरला. अक्षयचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला, चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळाले. तरीही प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर गर्दी करत चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटामुळे अक्षय कुमारच्या मागे लागलेलं फ्लॉप चित्रपटांचं शुक्लकाष्ठ संपलं. आता अक्षयच्या पुढील प्रोजेक्टची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

‘वेलकम ३’मध्ये अक्षय दिसणारच आहे पण आणखी एका फ्रैंचाइजची सध्या चांगलीच चर्चा होत आहे ते म्हणजे ‘हाऊसफुल’. या सीरिजमधला पाचवा भाग म्हणजेच ‘हाऊसफुल ५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निर्माते साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमार या दोघांच्या करिअरचा हा चित्रपट सगळ्यात महागडा चित्रपट ठरणार आहे. अक्षयने रजनीकांत यांच्या ‘२.०’मध्ये काम केलं होतं, पण त्यात अक्षय सहाय्यक भूमिकेत होता.

आणखी वाचा : “माझी भूमिका उत्तम पण…” ‘ड्रीम गर्ल २’मधील भूमिकेच्या लांबीविषयी परेश रावल यांचं वक्तव्य

मीडिया रीपोर्टनुसार अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’चं बजेट ३७५ कोटी असेल असं सांगितलं जात आहे. याबरोबरच भारतीय चित्रपट फ्रैंचाइजपैकी ‘हाऊसफुल’ ही एकमेव फ्रैंचाइज आहे जीचे ५ भाग बनणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख असणार हे साहजिक आहेच, पण लवकरच यातील इतर कलाकारांची नावंदेखील लवकरच समोर येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून महिन्यातच अक्षय कुमारने ट्विट करत या पाचव्या भागाबद्दल माहिती दिली होती. तरुण मनसुखानी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण २०२३ च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय साजिद यांच्याबरोबरच अक्षय कुमार ‘आवारा पागल दिवाना’ आणि ‘हेरा फेरी ३’, आणि ‘वेलकम ३’ या चित्रपटांवरही काम करत आहे.