scorecardresearch

Video: ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर लीक; सलमानची दमदार अ‍ॅक्शन, डायलॉग्स अन् कहाणीत ट्विस्ट, पाहा व्हिडीओ

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या स्क्रीनिंगच्या आधी प्रदर्शित झाला.

Video: ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर लीक; सलमानची दमदार अ‍ॅक्शन, डायलॉग्स अन् कहाणीत ट्विस्ट, पाहा व्हिडीओ
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘पठाण’ चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत. शाहरुखच्या चित्रपटात सलमान खानने कॅमिओ केला आहे. त्या कॅमिओची देखील चांगलीच चर्चा आहे. अशातच सलमान खानचा आगामी अॅक्शन-थ्रिलर ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या स्क्रीनिंगच्या आधी प्रदर्शित झाला. या टीझरचा व्हिडीओ रेकॉर्ड करून काहींनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Pathaan Movie Review : जबरदस्त अ‍ॅक्शन, शाहरुख खानचा दमदार कमबॅक, पण कथेच्या बाबतीत कमकुवत ठरला ‘पठाण’

हा चित्रपट सलमानच्या इतर मसाला अॅक्शन चित्रपटांसारखाच आहे. पण, यात दक्षिण भारतीय हिट चित्रपटांची पद्धत अवलंबली आहे. तसेच, चित्रपटात दक्षिण भारतातील पार्श्वभूमी पाहायला मिळेल, असं टीझरवरून दिसतंय. कारण, काही सीनमध्ये सलमान लुंगी घालून डान्स करताना दिसत आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश आणि जगपती बाबू यांचीही झलक पाहायला मिळते. सलमानने दाक्षिणात्य प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने ‘दबंग ३’ मध्ये किच्चा सुदीपला खलनायकाच्या भूमिकेत घेतलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी, तो चिरंजीवी-स्टारर ‘गॉडफादर’मध्ये कॅमिओ करताना दिसला होता.

Video: सलमान खानने अचानक घेतली आमिर खानची भेट; सात वर्षांनी दोघांमधील वाद संपला? भेटीचं नेमकं कारण काय

टीझर पूर्ण अ‍ॅक्शन-पॅक आहे. यात “सही का होगा सही, गलत का गलत,” असं सुरुवातीला सलमान म्हणतातना दिसतोय. वाळवंटात बाईक चालवतानाचे त्याचे शॉट्स आहेत, तसेच अभिनेत्याच्या आयकॉनिक ब्रेसलेटच्या क्लोज-अपचेही अनेक शॉट्स पाहायला मिळतात. जेव्हा पूजा हेगडे सलमानला त्याचे नाव काय आहे, असं विचारले तेव्हा तो म्हणतो, “माझं कोणतंच नाव नाहीये, पण मी भाईजान नावाने ओळखला जातो.”

हा चित्रपट यंदा ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागा यांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 15:31 IST

संबंधित बातम्या