सलमान खानच्या टायगर ३ चित्रपटाची सध्या थिएटर्समध्ये जादू पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी (१२ नोव्हेंबर रोजी) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांत जबरदस्त कामगिरी केली आहे. देशभरात चित्रपटाने २०० कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. या चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी मुख्य कलाकार सलमान खान, कतरिना कैफ व इमरान हाश्मी एकत्र आले.

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी ‘टायगर ३’ च्या सक्सेस इव्हेंटमध्ये सहभागी झाले. यावेळी सलमान निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम घालून आला होता. तर, पिवळ्या रंगाच्या वन पीसमध्ये कतरिना कमालीची सुंदर दिसत होती. इमरानने काळ्या रंगाचा टी-शर्ट व ग्रे पँट घातली होती. या कार्यक्रमात सलमान-कतरिना चित्रपटातील ‘लेके प्रभु का नाम’ या गाण्यावर थिरकले. तसेच सलमानने इमरान हाश्मीला किस केले.

दमदार सुरुवात करणाऱ्या ‘टायगर ३’ च्या कमाईत सातत्याने घट, सहाव्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी, वाचा एकूण कलेक्शन

कार्यक्रमादरम्यान सलमान खान म्हणाला, “या चित्रपटात कतरिना आहे, त्यामुळे थोडा रोमान्स तर पाहिजेच.” यानंतर सलमान खान इमरान हाश्मीकडे पाहत म्हणाला, “जर इमरानने आतिशची भूमिका केली नसती तर हे झालं असतं.” नंतर सलमानने इमरानला किस केलं. हे पाहून कतरिनाही सलमानच्या या कृतीवर हसताना दिसली आणि उपस्थित लोकही हसू लागलो. सलमान खान इमरानला किस करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खान व कतरिना कैफ यांच्या स्पाय सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. यापूर्वी या फ्रेंचायजीचे ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट आले होते. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर आता तिसऱ्या भागानेही चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.