बॉलीवूडचा भाईजान सलमान खान अनेकदा गरजू लोकांना मदत करत असतो. सध्या सलमानचा त्याच्या लहानग्या चाहत्याबरोबरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तो मुलाशी संवाद साधताना दिसत आहे. या फोटोबद्दल जी माहिती समोर आली आहे, ती वाचून तुम्हालाही सलमान खानचं कौतुक वाटेल.

फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाने नुकतीच कर्करोगावर मात केली आहे. तो फक्त ९ वर्षांचा आहे. त्याचं नाव जगनबीर आहे. सलमानने त्याला २०१८ मध्ये एक वचन दिलं होतं, ते वचन त्याने पाच वर्षांनी पूर्ण केलं आहे. ९ केमोथेरपीनंतर कॅन्सरवर मात करणाऱ्या जगनबीर या ९ वर्षीय चाहत्याची सलमान खानने भेट घेतली. २०१८ मध्ये सलमान मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये जगनबीरला भेटला होता, तेव्हा ४ वर्षांच्या जगनबीरवर केमोथेरपी सुरू होती. कॅन्सरवर यशस्वी केल्यानंतर तुला भेटेन, असं सलमान खानने जगनबीरला वचन दिलं होतं. सलमानच्या या वचनाने जगनबीरला या जीवघेण्या आजाराशी लढण्याची प्रेरणा मिळाली.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर जगनने डिसेंबर २०२३ मध्ये सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मग त्याच महिन्यात त्याने सलमानच्या वांद्रे येथील घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. जगनबीरची आई सुखबीर कौर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जगनबीर ३ वर्षांचा असताना त्याची दृष्टी गेली होती. डॉक्टरांना त्याच्या मेंदूमध्ये गाठ आढळली होती. डॉक्टरांनी त्याला दिल्ली किंवा मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. जगनच्या वडिलांनी मुंबईला जायचं ठरवलं. जगनला वाटले की तो सलमान खानला भेटणार आहे.

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुखबीर कौर म्हणाल्या की जगनचा उत्साह पाहून त्यांनी त्याला खरं सांगितलं नाही. त्याला रुग्णालयात दाखल करून सलमानला भेटण्याचं आश्वासन दिले. मग त्यांनी जगनबीरचा एक व्हिडीओ बनवला ज्यामध्ये तो सलमानला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. हा व्हिडिओ सलमानपर्यंत पोहोचला आणि सलमान त्याला भेटायला आला. जगनला दिसत नव्हतं, त्यामुळे विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने सलमानच्या चेहऱ्याला आणि ब्रेसलेटला स्पर्श करून खात्री केली. सुखबीर यांच्यामते आता जगनबीर बरा झाला असून त्याची ९९ टक्के दृष्टी परत आली आहे. तो आता नियमित शाळेत जातो.