सलमान खानसुद्धा एका मोठ्या काळानंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्यास सज्ज आहे. २०१९ साली ‘दबंग ३’मध्ये सलमान दिसला. नंतर २०२१ मध्ये ‘अंतिम’मध्ये सलमान होता पण त्यात त्याची मुख्य भूमिका नव्हती. आता तब्बल ३ वर्षांनी सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडला आहे तर गाणीदेखील सुपरहीट आहेत.

सलमानच्या या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फार मर्यादित ठिकाणी याचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. मुंबईतील आलिशान सिंगल स्क्रीन थिएटर गेटी गॅलक्सिचाही याच्या रात्रीच्या बुकिंगमध्ये समावेश करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारचे शो अवघ्या तासाभरात हाऊसफूल झाल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या या चित्रपटाचे चारपैकी तीन शो आतापर्यंत पूर्णपणे बुक झाले आहेत.

आणखी वाचा : “महत्त्वाच्या भूमिका फक्त अमिताभ बच्चन यांच्यासाठीच…” ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी व्यक्त केली खंत

ज्यापद्धतीने ‘किसी का भाई किसी की जान’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे, त्यानुसार सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की आहे. या चित्रपटात अधिकाधिक प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्याची ताकद आहे. यासोबतच सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या सगळ्यागोष्टींचा चित्रपटाला फायदा होणार हे नक्कीच आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश, भूमिका चावला, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जगपती बाबू, विजेंदर सिंग, पलक तिवारी आणि जस्सी गिल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सलमानचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट हे ईदच्याच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. आता यंदा ईदच्या निमित्ताने पुन्हा बॉस ऑफिसवर सलमान खान राज्य करणार का ते लवकरच समोर येईल.