साउथ स्टार समांथा रुथ प्रभू ही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंटवा’ गाण्यामुळे घराघरांत पोहोचली. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाद्वारे समांथाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आणि समांथा लोकप्रिय अभिनेत्री ठरली. तिच्या अभिनयातील कामगिरीसाठी अनेकदा तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जाहीर झाला आहे.

समांथाने सध्या अभिनय क्षेत्रापासून विश्रांती घेतली असून, मलेशियामध्ये ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. या ट्रिपचे फोटोज तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तपकिरी रंगाच्या बिकिनीवर समांथाचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. निसर्गाचा आनंद घेत समांथा क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे.

आजूबाजूची हिरवळ, गर्द झाडीतले घर, सुंदर कमळ असे नैसर्गिक सौंदर्य टिपणारे क्षण समांथाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या निसर्गरम्य वातावरणात ती मेडिटेशन करतानाही दिसत आहे.

हेही वाचा… डेटवर गेल्यावर बिलाचे पैसे भरणाऱ्या फेमिनिस्ट स्त्रियांना जया बच्चन यांनी लगावला टोला; म्हणाल्या, “त्या किती मूर्ख…”

‘हायेस्ट लव्ह’ असे कॅप्शन देत समांथाने हे फोटोज शेअर केले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “नागा चैतन्य बाथरूममध्ये रडत असेल.” तर दुसऱ्याने लिहिले, “मला तुमचा फोटोग्राफर बनायला आवडेल.”

समांथा ऑटो इम्युन कंडिशन (मायोसिटिस) नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. हा एक त्वचेचा आजार आहे. ज्यामुळे इतर अनेक समस्यांसह स्नायू दुखतात. अनेक महिन्यांपासून या आजारावर ती उपचार घेत आहे. त्यामुळेच ती अभिनय क्षेत्रापासून दूर होती. परंतु, तिने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली; ज्यात तिने सांगितले की ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे. लवकरच समंथाचा हेल्थ पॉडकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा… ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, समंथाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुशी’ चित्रपटात समांथा विजय देवरकोंडाबरोबर दिसली होती. आता ती वरुण धवनसह ‘सिटाडेल : इंडिया’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. प्रियांका चोप्राच्या वेब सीरिजचा हा हिंदी रीमेक आहे.