Sanjay Dutt Second Wife : संजय दत्त त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला. संजय दत्तने तीन लग्नं केली. मान्यता दत्त ही संजय दत्तची तिसरी बायको आहे. संजयच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा होतं. रिचापासून संजयला त्रिशला नावाची मुलगी आहे. रिचाचे १९९८ मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर संजयने मॉडेल रिया पिल्लईशी दुसरं लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. सात वर्षांनी २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

संजय दत्तची दुसरी बायको रिया पिल्लई ६० वर्षांची आहे. रिया सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. आता बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर असलेली रिया पिल्लई फॅशन डिझायनर म्हणून काम करते. तिचा ‘द टेंपल हाउस बाय रिया पिल्लई’ नावाचा स्वतःचा ब्रँड आहे.

रिया पिल्लईने फॅशन इंडस्ट्रीत येण्यापूर्वी एअर होस्टेस म्हणून काम केलं होतं. नंतर ती मॉडेलिंगकडे वळली आणि तिने अनेक लोकप्रिय ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं. तिने २००६ मध्ये कॉर्पोरेट चित्रपटात एक लहानशी भूमिका केली होती.

हेही वाचा
पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजताच अभिनेत्रीने त्याला धडा शिकवायला अफेअर केलं अन्…, नंतर जे घडलं…

रिया पिल्लईची कौटुंबीक पार्श्वभूमी

रिया पिल्लईचा जन्म २७ जून १९६५ रोजी लंडनमध्ये झाला होता. हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची ती नात आहे. रिया पिल्लईची आजी झुबैदा यांनी भारतातील पहिला बोलपट ‘आलम-आरा’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. रियाचे वडील रेमंड पिल्लई हे बिझनेसमन होते, तर तिची आई दुरेश्वर धनराजगीर डॉक्टर होती.

रियाचा पहिला घटस्फोट अन् संजय दत्तशी अफेअर

संजय दत्तच्या आयुष्यात येण्यापूर्वीच रियाचे लग्न झाले होते. तिने १९८४ मध्ये मायकेल वाझशी लग्न केले होते, परंतु १० वर्षांनी १९९४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रियाने नंतर एअरहोस्टेस म्हणून काम करायला सुरुवात केली. यासोबतच तिने मॉडेलिंगही सुरू केलं. त्यादरम्यान तिची संजय दत्तशी मैत्री झाली, मात्र मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त तुरुंगात गेला. ती संजयला भेटण्यासाठी अनेकदा तुरुंगात जात असे. हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. संजय दत्त तुरुंगातून सुटल्यावर त्याने रियाला प्रपोज केले आणि दोघांनी साई मंदिरात लग्न केले होते.

sanjay dutt rhea pillai
संजय दत्त व रिया पिल्लई (फोटो- सोशल मीडिया)

लग्नानंतर संजय दत्त शूटिंगमध्ये व्यग्र झाला, त्यामुळे तो रियाला वेळ देऊ शकत नव्हता. अशातच दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. परिणामी रियाचे नाव लिएंडर पेसशी जोडले गेले आणि संजयच्या आयुष्यात डान्सर नादिया दुर्राणीची एंट्री झाली. नंतर अवघ्या काही वर्षातच ते वेगळे झाले आणि २००८ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिया पिल्लईचे अफेअर

संजय दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर रिया पिल्लई टेनिसपटू लिएंडर पेससोबत राहू लागली. दोघांना एक मुलगी अयाना झाली. मात्र, काही काळानंतर या नात्यातही दुरावा निर्माण झाला. रियाने २०१४ मध्ये लिएंडर पेसवर गंभीर आरोप केले आणि तो मारहाण करत असल्याची तक्रार दाखल केली. त्यावेळी लिएंडरने न्यायालयात सांगितलं की त्याने रियाशी कधीही लग्न केलं नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. रियाने लिएंडरवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. रियाचं हे तिसरं नातं होतं, हे नातंही टिकलं नाही आणि दोघे वेगळे झाले. सध्या रिया एकटीच मुलीचा सांभाळ करत आहे.