Sanjay Dutt Talks About His Father : संजय दत्त सध्या ‘बागी ४’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. व्यवसायिक आयुष्यासह तो खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. अशातच नुकतच त्याने एका कार्यक्रमात त्याच्या वडिलांबरोबरचा एक किस्सा सांगितला आहे

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमाच्या नवीन भागात अभिनेता संजय दत्त व सुनील शेट्टी झळकणार आहेत. त्यांचा यासंबंधित व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. संजय दत्त व सुनील शेट्टी यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत जु्न्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. कार्यक्रमादरम्यान कपिल शर्माने संजय दत्तला, जेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्हाला अभिनेता व्हायचं आहे, तेव्हा तुमच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल विचारलेलं.

अभिनेता व्हायचं सांगितल्यानंतर कानाखाली मारली – संजय दत्त

कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत संजय दत्त म्हणाला, “त्यांनी मला एक कानाखाली मारलेली.” त्यावेळी सुनील शेट्टी यांनी संजय दत्त यांच्याबरोबर काम करतानाचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “हैदराबाद येथे ताज हॉटेलमध्ये त्याने माझ्या खोलीचा दरवाजा तोडलेला. मला माहीत नव्हतं काय झालं. यावर संजय दत्त म्हणाला, “ते प्रम होतं.” त्यावर सुनील शेट्टीसुद्धा गंमत करत उत्तर देत म्हणाले, असं प्रेम कोणालाही नकोय.”

कपिलने पुढे संजय दत्तला नवरा म्हणून तुम्ही स्वत: किती गुण द्याल असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्याने “१५ पैकी १०” असं उत्तर दिलं. जेव्हा सुनील शेट्टी यांनाही याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, “कदाचित ७ किंवा ८.”

सुनील शेट्टी पुढे म्हणाले, “एक पुरुष म्हटल्यानंतर तुम्हाला काम करण्यासाठी बाहेर जावं लागतं. मी अनेक गोष्टींचा अनुभव घेऊ शकलो नाही, म्हणून मला वेळेची किंमत आहे. मला वेळ किती अमुल्य आहे हे समजलं, जेव्हा माझ्या लेकीचं लग्न झालं आणि आता जेव्हा तिला मुलगी झाली आहे तेव्हा कळतं की त्यावेळी माझ्या बायकोने मी कामावर असताना मुलांचं किती केलं असेल.” हे ऐकल्यानंतर संजय दत्त स्वत:ला नवरा म्हणून १० पैकी ७ गुण देताना दिसतो.

दरम्यान, संजय दत्तबद्दल बोलायचं झालं तर त्यांने ‘रॉकी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. संजय दत्तला घरातून अभिनयाचा वारसा होता. त्याच्या आई लोकप्रिय अभिनेत्री होत्या, तर वडील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते.