शेफ संजीव कपूर हे भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. त्यांच्या ‘खाना खजाना’ या कार्यक्रमाने टेलिव्हिजनवर इतिहास घडवला होता. दुपारी लागणारा हा कार्यक्रम महिला वर्ग आवर्जून पाहायचा. तेव्हा संजीव कपूर यांची मोठी क्रेझ होती. या कार्यक्रमामुळे त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा मिळाला होता. सध्या सुरु असलेल्या ‘मास्टरशेफ’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली होती. ते सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत.

अभिनेत्री ट्विंकल खन्ना गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून लांब राहिली आहे. अभिनयामध्ये यश न मिळाल्याने तिने लेखनामध्ये पदार्प केले. तिने Tweak India या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर ट्विंकल सेलिब्रिटींना बोलवून हसत-खेळत त्यांची मुलाखत घेत असते. यंदाच्या भागामध्ये तिने मुलाखत देण्यासाठी सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांना आमंत्रित केले होते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. बोलत असताना ट्विंकलने बायोपिकचा विषय काढला.

तिने संजीव यांनी “तुमच्या बायोपिकमध्ये बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्याने तुमचे पात्र साकारावे असे तुम्हांला वाटते?” असा सवाल केला. तेव्हा त्यांनी पटकन “अक्षय कुमार कुठे आहेत?” असे म्हटले. पुढे संजीव कपूर यांनी हसत “त्यांना चांगलं जेवण सुद्धा बनवता येतं…” हे विधान केले. अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी अक्षयने अनेक हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केले आहे. या क्षेत्रातील ज्ञान मिळवण्यासाठी तो थायलंडला गेला होता. सुरुवातीच्या काळात अक्षय तेथे वास्तव्याला होता.

आणखी वाचा – ऑस्कर सोहळ्यात ‘RRR’च्या टीमला मिळाली नाही फ्री एन्ट्री, राजामौलींना प्रत्येक तिकिटासाठी मोजावी लागली ‘इतकी’ रक्कम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजीव कपूर यांच्या उत्तरामुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा बायोपिकमध्ये दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यामध्ये प्रदर्शित झालेले त्याचे बरेचसे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्याच्या ‘ओ माय गॉड २’, ‘बडे मियॉं छोटे मियॉं’, ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांबद्दल चर्चा सुरु आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाद्वारे अक्षय मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.