scorecardresearch

Premium

Cannes 2023 : कान्सच्या रेड कार्पेटवर भारतीय पेहराव का केला? सारा अली खानने सांगितले कारण, म्हणाली…

सारा अली खानच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३’मधील लुकचे चाहत्यांकडून कौतुक

sara ali khan
सारा अली खानच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३’मधील लुकचे चाहत्यांकडून कौतुक ( फोटो : लोकसत्ता संग्रहित )

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल-२०२३’मध्ये यंदा अनुष्का शर्मा, मानुषी छिल्लर, सारा अली खान, मृणाल ठाकूर या अभिनेत्रींनी पदार्पण केले. कान्सच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री सारा अली खानने रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. साराने भारतीय संस्कृतीला साजेसा लेहेंगा परिधान करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारतीय संस्कृतीप्रमाणे पोशाख करण्यास प्राधान्य का दिले? याबाबत साराने खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video: प्रसिद्ध अभिनेत्याने रणबीर कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर स्कर्ट घालून केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

सारा म्हणाली, “आपला भारत देश हा अनेक भाषा आणि संस्कृती यांनी परिपूर्ण असा देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा कान्स फेस्टिव्हलसारख्या जागतिक व्यासपीठावर प्रचार करणे महत्त्वाचे आहे. आपण सांस्कृतिकदृष्ट्या एवढे समृद्ध आहोत याचा मला अभिमान आहे.” साराने कान्ससाठी परिधान केलेला लेहेंगा अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला आहे. या लेहेंग्यावर साराने ड्रॉप इअररिंग्स घातले होते. तसेच तिने अगदी लाइट मेकअप केला होता. कान्सच्या रेड कार्पेटवरील भारतीय लूकमुळे सध्या साराची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : “राम सिया राम…” ‘आदिपुरुष’ चित्रपटातील नवे गाणे ऐकून प्रेक्षक म्हणाले “आम्ही धन्य झालो…”

सारा पुढे म्हणाली, “मला सगळ्यात काम करायला आवडेल… मग तो प्रादेशिक सिनेमा असो किंवा पाश्चात्त्य, आपल्या देशात अनेक भाषा आहेत, ज्यात मी अजून काम केलेले नाही. अर्थात याबरोबर हॉलीवूडमध्येही काम करण्याची माझी इच्छा आहे.”

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून सारा अली खान आणि विकी कौशल ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २ जूनला प्रदर्शित होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 15:11 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×