अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा भव्य प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. मुकेश अंबानींनी या सोहळ्यासाठी बॉलीवूड, राजकीय ते क्रिकेट विश्वातील मान्यवरांना निमंत्रित केलं होतं. एवढेच नव्हे तर हॉलीवूड गायिका रिहाना, एकॉन यांचे खास परफॉर्मन्स या कार्यक्रमात सादर करण्यात आले. १ ते ३ मार्च या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी संपूर्ण कलाविश्व जामनगरमध्ये अवतरल्याचं पाहायला मिळालं. अनंत-राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी तेंडुलकर कुटुंबीय देखील जामनगरला पोहोचले होते. सचिन तेंडुलकरची लेक साराने या सोहळ्यातील काही खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये तेंडुलकर कुटुंबीयांचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे. यावेळी सचिनच्या लाडक्या लेकीने तिच्या आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर खास फोटो काढला. साराची आवडती हिरोईन कोण असेल? असा प्रश्न तिच्या सगळ्याच चाहत्यांना पडला होता. अखेर साराने फोटो शेअर करत यासंदर्भात खुलासा केला आहे. हेही वाचा : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला मैत्रिणीच्या घरी चोरी केल्याप्रकरणी अटक, तब्बल १५० तोळे सोनं लंपास केल्याचा आरोप ९० चं दशक आणि प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी राणी मुखर्जी ही साराची आवडती अभिनेत्री आहे. अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सारा आणि राणीने खास सेल्फी काढला. या फोटोला सचिनच्या लेकीने "माय फॉरएव्हर फेव्हरेट" (Widest Smiles With My Forever Favourite ) असं कॅप्शन दिलं आहे. तसेच साराची आई अंजली आणि राणीने देखील या सोहळ्यात खास फोटो काढला होता. हेही वाचा : “मी कोणाच्याही लग्नात नाचले नाही”, कंगना रणौतची ‘ती’ पोस्ट चर्चेत; लता मंगेशकरांचा उल्लेख करत म्हणाली… सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम पोस्ट आई अंजली आणि राणीच्या फोटोला "अंजली अँड टिना" असं कॅप्शन देत सारा तेंडुलकरने 'कुछ कुछ होता हैं' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याचा ३ मार्चला समारोप झाला असून भव्य पार्टीनंतर आता येत्या जुलै महिन्यात हे जोडपं विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.