Satish Kaushik Passed Away : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कलाकारांसह चाहते मंडळीही हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान सतीश यांच्या मुलीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा – सतीश कौशिक यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? मध्यरात्रीच रुग्णालयामध्ये जात होते पण…
१९८५मध्ये सतीश व शशी यांचं लग्न झालं. ३८वर्षे या दोघांनी अगदी सुखाने संसार केला. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर सतीश व शशी यांना मुलगा झाला. त्याचं नाव शानू होतं. पण सतीश यांच्या मुलाचं वयाच्या दुसऱ्या वर्षी निधन झालं होतं. छोट्या मुलाच्या निधनामुळे कौशिक यांना मोठा धक्का बसला होता.
पण १६ वर्षांनी २०१२मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांना मुलगी झाली. वयाच्या ५६व्या वर्षी सतीश पुन्हा वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव वंशिका असं आहे. वंशिकाबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटो सतिश सोशल मीडियाद्वारे शेअर करायचे. तसेच वंशिकाचंही सोशल मीडियावर अकाऊंट आहे. वंशिका अभ्यासामध्ये अगदी हुशार आहे. ती आता १० वर्षांची आहे.
सोशल मीडियावर तिने शेअर केलेले व्हिडीओ पाहून ती वडिलांच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत आहे असं दिसत आहे. रिल्स व्हिडीओद्वारे ती उत्तम अभिनयही करताना दिसते. वंशिका तिच्या वडिलांप्रमाणेच अगदी हुशार आहे. शिवाय तिला कलाक्षेत्राची आवड असल्याचं व्हिडीओंमधून दिसून येतं. शिवाय काही तासांपूर्वीच तिने वडिलांबरोबरचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.