अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता. सध्या तो त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख खानचा पठाण चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पठाणच्या यशानंतर आता शाहरुख खानने नवीन गाडी खरेदी केली आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

बॉलिवूडचा किंग अशी ओळख असलेल्या शाहरुख खानने नुकतंच रोल्स-रॉयस ही गाडी खरेदी केली आहे. शाहरुख खानने खरेदी केलेली गाडी ही रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही या प्रकारातील आहे. भारतातील सर्वात महागडी गाडी म्हणून तिला ओळखले जाते. या आलिशान गाडीची किंमत ८ कोटींहून अधिक आहे. तर या कारची ऑन रोड किंमत १० कोटी इतकी असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : “हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड चांगले” शाहरुखच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियांका चोप्राचा संताप, म्हणाली “डोक्यात हवा…”

नुकतंच शाहरुखच्या या नव्या कोऱ्या गाडीची झलक समोर आली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखने खरेदी केलेली गाडी ही पांढऱ्या रंगाची आहे. शाहरुखने त्याचा लकी नंबर हा गाडीचा नंबर म्हणून घेतला आहे. शाहरुखच्या गाडीचा नंबर ‘५५५’ असा आहे. ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुखने ही गाडी खरेदी केल्याचे बोललं जात आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोघांची घुसखोरी, सुरक्षा असूनही घटना घडल्याने खळबळ

शाहरुख खानबरोबरच ‘एटली’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपतीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तसेच शाहरुख खान सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.