बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा : “तू सिगारेट सोडलीस का?” शाहरुख खानने दिलेले उत्तर पाहून चाहते चक्रावले, म्हणाले “जरा काळजी…”

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला ट्विटरवर एका नेटकऱ्याने‘आस्क एसआरके’सेक्शनमध्ये “तुझ्याकडे असे काय आहे जे इतर कोणत्याच अभिनेत्याकडे नाही” हा प्रश्न विचारला. नेटकऱ्याच्या या प्रश्नाला शाहरुखने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. शाहरुख म्हणाला, “माझ्याकडे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, देवदास, स्वदेस, चक दे इंडिया, पठाण, ओम शांती ओम आहे… मला आता स्वत:चा मोठेपणा जरा कमी केला पाहिजे.” असे लिहून पुढे शाहरुख हसला.

हेही वाचा : “सीता मातेबरोबर स्वत:ची तुलना करू नकोस” क्रिती सेनॉनने शेअर केलेला ‘तो’ फोटो पाहून नेटकरी संतापले

शाहरुखने दिलेल्या या भन्नाट उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्याने उल्लेख केलेल्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.

हेही वाचा : आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी…’चा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज; ‘आदिपुरुष’ची लोकप्रियता पाहून करण जोहरचा मोठा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखबरोबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. जवान ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ‘पठाण’नंतर या शाहरुखचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.