शाहरुख खानच्या ‘पठाण’ या कमबॅक चित्रपटाचा ताप अजूनही चाहत्यांच्या डोक्यावरून उतरलेला नाही. या चित्रपटाच्या ‘झूम जो पठाण’ या गाण्याच्या रिल्स आणि व्हिडिओंनी सोशल मीडिया तुडुंब भरला आहे. या यादीत आणखी एक भर पडली आहे. खरं तर, क्रिकेटर इरफान पठाणच्या धाकट्या मुलानेही ‘झूम जो पठाण’वर डान्स केला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द किंग खान म्हणजेच शाहरुख खाननेही इरफान पठाणच्या मुलाच्या क्यूट व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘झूमे जो पठाण’वर इरफान पठाणच्या मुलाने केला डान्स
आपल्या मुलाचा व्हिडिओ पोस्ट करताना क्रिकेटर इरफान पठाणने लिहिले की, “खान साहब @iamsrk कृपया तुमच्या यादीत आणखी एका क्यूट फॅनचा समावेश करा.” व्हिडिओमध्ये इरफान पठाणचा लहान मुलगा मोबाईलवर पठाण चित्रपटातील ‘झूम जो पठाण’ हे गाणे ऐकताना आणि त्यावर नाचताना दिसत आहे.
इरफानच्या मुलाच्या व्हिडिओवर शाहरुखने प्रतिक्रिया दिली
शाहरुख खानने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत तो व्हिडिओ रीपोस्ट केला आहे. “तो तुमच्यापेक्षा जास्त प्रतिभावान निघाला… छोटा पठाण.” असे शाहरुखने ट्विट केले.
OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवरही ‘पठाण’ रिलीज
‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून यशराज फिल्म्स निर्मित आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि अजूनही तिकीट खिडकीवर भरपूर कमाई करत आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणाही होते. तर सलमान खानने ‘पठाण’मध्ये कॅमिओ केला होता. हा चित्रपट 22 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झाला आहे.