अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर १० जुलैला प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटांच्या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘जवान’चा जबरदस्त ट्रेलर पाहून शाहरुखचे चाहते चित्रपटाची आता आतुरतेनं वाटत पाहत आहेत. अशातच बॉलीवूड इंडस्ट्रीमधला शाहरुखचा खास मैत्री अर्थात सलमान खाननं ट्रेलर पाहून चित्रपटाचं पहिलं तिकिट बुक केल्याचं समोर आलं आहे.

सलमान शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर ट्वीट करत म्हणाला की, “आता पठाण जवान झाला. धमाकेदार ट्रेलर. मला खूप आवडला. हा चित्रपट सगळ्यांनी चित्रपटगृहातच जाऊन बघावा, असा हा चित्रपट वाटतं आहे. मी तर पहिल्याच दिवशी जाणार आहे. मज्जा आली, व्वा शाहरुख खान.

हेही वाचा – ’72 हूरें’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; पाचव्या दिवशी फक्त ‘एवढीच’ कमाई

हेही वाचा – “तुमच्याबरोबर काम करणं अभिमानास्पद”, शाहरुख खान दाक्षिणात्य सुपरस्टारच्या प्रेमात

शाहरुख खाननं सलमानच्या याच ट्वीटचं आज उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, “त्यामुळे पहिल्यांदाच भाऊ तुम्हालाच दाखवला होता. शुभेच्छांबद्दल आणि चित्रपटाचं पहिलं तिकिट बुक केल्याबद्दल आभारी आहे.” शाहरुखच्या या ट्वीट खाली नेटकरी सलमान आणि त्याचे जुने फोटो पोस्ट करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. ट्रेनमधल्या सीनमध्ये दोघं एकत्र दिसले होते, ज्यात शाहरुख वाचवताना सलमान दिसला होता. आता किंग खान भाईजानच्या ‘टाइगर ३’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.