जगात एका सारखी दिसणारी सात माणसं असतात असं म्हणतात. याची प्रचिती अनेक बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्याप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून आली आहे. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, शाहरुख खान अशा अनेक सेलिब्रेटींचे डुप्लिकेट्स सोशल मीडियावर आतापर्यंत चर्चेत आले आहेत. या व्यक्ती इतक्या त्या सेलिब्रेटिंप्रमाणे दिसतात की आपल्यालाही त्यांच्यातला फरक ओळखणं कठीण जातं. आता सोशल मीडियावर शाहिद कपूरचा डुप्लिकेट लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा : “रवीना टंडनला पद्मभूषण देणं म्हणजे…” ‘त्या’ ट्वीटमुळे प्रसिद्ध निर्माता ट्रोल

शाहिद कपूर गेली अनेक वर्ष त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. त्याचं दिसणं, त्याचं हसणं, त्याचं वागणं हे सगळेच चाहत्यांना आकर्षित करतं. तर आता त्याच्याच प्रमाणे दिसणारी एक व्यक्ती पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्याकडे बघून सर्वांनाच दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या शाहिद कपूरची आठवण झाली.

हेही वाचा : Video: मीराला बघताच शाहिद कपूरमधील कबीर सिंग झाला जागा; त्रासलेली पत्नी म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहिद कपूरप्रमाणे दिसणारा या मुलाचं नाव तुषार शान आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. आतापर्यंत अनेकदा त्याने शाहिद कपूरच्या डायलॉग वर त्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तुषारची शरीरयष्टी आणि त्याचा दिसणं हे तंतोतंत शाहिद कपूरसारखे आहे. तुषारला पाहून शाहिदचे चाहते ही काहीसे गोंधळून गेलेले दिसले. त्यामुळे आता सोशल मीडियावर सर्वत्र शाहिद कपूरच्या डुप्लिकेटची चर्चा आहे.