नीलिमा अझीम एक ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना आहेत. त्यांचा जन्म बिहारची राजधानी पाटण्यात झाला होता. नीलिमांचे वडील अन्वर अझीम हे पत्रकार आणि ज्येष्ठ लेखक होते. नीलिमाची आई खदिजा या चित्रपट निर्माते ख्वाजा अहमद अब्बास यांच्या नातेवाईक होत्या. नीलिमा यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती आणि त्यांनी लहान वयातच डान्स सुरू केला होता.
नीलिमा यांनी बिरजू महाराज यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ १५ वर्षांच्या नीलिमाची पंकज कपूरशी मैत्री झाली होती. जवळपास २ वर्षांनी दोघांनी १९७५ मध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी नीलिमा फक्त १७ वर्षांच्या होत्या आणि पंकज कपूर २१-२२ वर्षांचे होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर नीलिमा यांनी २५ फेब्रुवारी १९८१ मध्ये शाहिद कपूरला जन्म दिला. शाहिदच्या जन्मानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा आला. सुमारे साडेतीन वर्षांनंतर १९८४ मध्ये नीलिमा अझीम आणि पंकज कपूर यांनी घटस्फोट घेतला.
नीलिमा यांनी शाहिदला सोबत ठेवले आणि सिंगल मदर म्हणून त्याचे संगोपन करू लागले. यानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी मैत्री झाली, दोघांनी १९९० मध्ये लग्न केले. १९९५ मध्ये नीलिमा आणि राजेश यांचा मुलगा ईशान खट्टरचा जन्म झाला. ईशानही बॉलिवूड अभिनेता आहे. लग्नाच्या सुमारे ११ वर्षानंतर नीलिमा आणि राजेश वेगळे झाले.
अदिती राव हैदरीने सिद्धार्थबरोबरच्या अफेअरबाबत सोडलं मौन; म्हणाली, “मला वाटतं की प्रत्येक…”
२००१ मध्ये नीलिमा आणि राजेश खट्टर यांचा घटस्फोट झाला. यानंतर नीलिमा यांची रझा अली खानशी मैत्री झाली. काही वर्षांच्या मैत्रीनंतर नीलिमा आणि रझा अली यांनी २००४ मध्ये लग्न केले. पण त्यांचे तिसरे लग्नही फार टिकू शकले नाही आणि २००९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता नीलिमा आपल्या मुलांसोबत खूश आहे. नीलिमांची राजेश खट्टरसोबतही चांगली मैत्री आहे. आता नीलिमा दोन्ही मुलं शाहिद कपूर आणि ईशान खट्टरसोबत वेळ घालवताना दिसतात.