ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित झाला; तेव्हापासून संपूर्ण जगभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांमध्ये ‘बार्बी’ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. खास करून प्रेक्षक वर्ग गुलाबी कपड्यांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचं दिसत आहे. त्यासंबंधीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असं असताना दुसऱ्या बाजूला ‘बार्बी’ चित्रपटावर टीका केली जात आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह भाषा व सीन्सवरून अभिनेत्री जुही परमार हिनं सोशल मीडियावर पत्र लिहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यानंतर आता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतनेही हा चित्रपट पाहून मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वातून पूजा भट्ट बाहेर? जाणून घ्या कारण

मार्गोट रॉबी, रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ चित्रपट पाहिल्यानंतर मीरा राजपूतने सोशल मीडियावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मीराने इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले रॉबी व गॉस्लिंग यांच्या डान्सच्या सीनचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोबरोबर तिने चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया लिहित हॉलिवूडची तुलना थेट बॉलीवूडशी केली आहे.

हेही वाचा – प्रदर्शनापूर्वीच कमल हसन यांच्या ‘इंडियन २’ चित्रपटाचा जलवा; तब्बल ‘इतक्या’ कोटींना विकले गेले ओटीटी अधिकार

मीरा राजपूतने ‘बार्बी’ चित्रपटाविषयी लिहिलं आहे की, “हॉलिवूड अमूक, हॉलिवूड तमूक म्हणे…पण बॉलीवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये गाणी व डान्स होऊ शकत नाही.” तिनं मांडलेलं हे परखड मत सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा – “पुरुषासारखी दिसतेस” कमेंट पाहून भडकली अर्चना पूरन सिंह; म्हणाली, “कमी वयात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बार्बी’ या चित्रपटात मार्गोट रॉबी व रायन गॉस्लिंगव्यतिरिक्त अमेरिका फेरेरा, सिमू लियू, केट मॅकिनॉन, मायकल सेरा, हेलेन मिरेन, एरियाना ग्रीनब्लाट यांसारखे जबरदस्त कलाकार मंडळी आहेत. भारतात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसांत या चित्रपटानं २१.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.