scorecardresearch

Video: शाहरुखची लेक करतेय बिग बींच्या नातवाला डेट? अगस्त्या नंदाने सर्वांसमोर केलं सुहानाला किस

Suhana Khan Agastya Nanda: सुहानाला कारमध्ये बसवल्यानंतर अगस्त्याने तिला फ्लाइंग किस दिला.

Shahrukh Khan Daughter Suhana Khan Dating Agastya Nanda
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शाहरुख खानची लेक सुहाना खान महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला डेट करत असल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी आले होते. पण, नंतर मात्र ते पुन्हा एकत्र दिसले नाहीत, त्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चा थांबल्या. पण आता मात्र पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे या दोघांच्या डेटिंगबद्दल बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

काकूकडून लैंगिक शोषण, दहावीत असताना शिक्षिकेने केलं Kiss, घरी कळालं अन्…; प्रसिद्ध अभिनेत्याचं खासगी आयुष्य चर्चेत

व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘वरिंदर चावला’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका पार्टीनंतरचा आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरी जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तान्या श्रॉफ पाहुण्याला सोडायला बाहेर आलेली दिसत आहे आणि यावेळी तिच्यासोबत अगस्त्य नंदा देखील आहे. त्याचवेळी, शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहानाही तिथे दिसत आहे. व्हिडीओमध्ये अगस्त्य सुहानाची काळजी घेताना दिसत आहे. सुहानाला कारमध्ये बसवल्यानंतर अगस्त्याने तिला फ्लाइंग किस दिला, यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

नेटकऱ्यांनाही हे दोघे डेट करत असल्याचं वाटतंय. काहींनी यावर त्यांच्या डेटिंगबद्दलच्या कमेंट्स केल्या आहेत. तर, यापूर्वी कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीमध्ये अगस्त्य व सुहानाने एकत्र हजेरी लावली होती. अगस्त्यने कुटुंबातील सदस्यांना सुहानाची जोडीदार म्हणून ओळख करून दिली होती, असंही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. दरम्यान, सुहाना व अगस्त्य ‘द आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 07:59 IST

संबंधित बातम्या