scorecardresearch

‘पठाण’ ठरला बॉक्स ऑफिसचा बादशाह; तज्ज्ञांच्या मते पहिल्या दिवशीच करणार ‘एवढी’ कमाई

पहाटे ६ वाजल्यापासून चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली

‘पठाण’ ठरला बॉक्स ऑफिसचा बादशाह; तज्ज्ञांच्या मते पहिल्या दिवशीच करणार ‘एवढी’ कमाई
फोटो : सोशल मीडिया

शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. २०२३ मधील हा पहिला बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट आहे. ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे झालेल्या वादानंतर चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंडचं सावट होतं. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याबदद्ल उत्सुकता होती. पण, शाहरुखच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली असून चाहते ‘पठाण’ला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

काही ठिकाणी चित्रपटाचे शो कॅन्सल झाले असले तरी बहुतांश ठिकाणी चित्रपटाचं जबरदस्त ओपनिंग झालं, पहाटे ६ वाजल्यापासून चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली. ‘पठाण’ने अडवांस बुकिंगमध्येच बरेच रेकॉर्ड तोडल्याचं वृत्त समोर आलं होतं, आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर याची पहिल्या दिवसाची कमाई किती असेल याबद्दल चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’मधील डॅशिंग लूक आणि जबरदस्त बॉडीसाठी शाहरुखने अशी घेतली मेहनत; ट्रेनरने सांगितलं यामागील रहस्य

रोहित जयसवाल आणि सुमित कडेल या दोन्ही चित्रपट विश्लेषक आणि तज्ञांनी त्यांच्या ट्वीटमधून ‘पठाण’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अंदाज बांधला आहे. त्यांच्या माहितीनुसार शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण’ पहिल्याच दिवशी ५० कोटीहून अधिक कमाई करणार आहे. गेल्या वर्षभरात हिंदी चित्रपटांना लागलेलं ग्रहण पाहता यावेळी हिंदी चित्रपट जबरदस्त कमाई करतील हे ‘पठाण’ने सिद्ध केलं आहे.

२०२३ हे वर्षं शाहरुखसाठी चांगलंच लाभदायक ठरणार आहे. ‘पठाण’मधून शाहरुख खानने कमबॅक केलंच आहे. आता ‘पठाण’नंतर शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. ‘पठाण’प्रमाणेच ‘जवान’मध्येही अॅक्शनचा तडका आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर नयनतारा आणि विजय सेतूपतीही दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 18:41 IST

संबंधित बातम्या