बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागच्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान बराच चर्चेत आहे. त्याचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. जगभरात या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. अजूनही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशात आता शाहरुखला एका चाहत्याने थेट एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो आणि चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. अनेकदा तो सोशल मीडियावर सेशन घेऊन चाहत्यांशी संवाद साधतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही देतो. नुकतंच त्याने चाहत्यांसाठी #AskSRK सेशन घेतलं होतं. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. ज्याची शाहरुखने मजेदार उत्तर दिली.

आणखी वाचा- महागड्या गाड्यांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर शाहरुख खानचा खुलासा, म्हणाला “माझ्याकडे…”

एका चाहत्याने याच सेशनमध्ये शाहरुखला FIR दाखल करण्याची धमकी दिली. ज्यावर शाहरुखनेही तेवढ्याच हजरजबाबीपणे मजेदार उत्तर दिलं. नुकत्याच घेतलेल्या #AskSRK सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखचा सिक्स पॅक अॅब्सवाला फोटो शेअर करत लिहिलं, “खानसाहेब, तुमच्या विरोधात FIR दाखल करत आहे की, हा माणूस खोटं बोलतो की हा ५७ वर्षांचा आहे.” यावर शाहरुखने उत्तर देताना लिहिलं, “कृपया असं करू नकोस, ठिक आहे की, मी मान्य करतो मी ३० वर्षांचा आहे. आता मी तुला सत्य काय ते सांगितलं आहे आणि यासाठीच माझ्या आगामी चित्रपटाचं नाव ‘जवान’ आहे.”

आणखी वाचा- “माझं करिअर उध्वस्त करण्यासाठी…”, गुलशन ग्रोवर यांचा बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा

दरम्यान शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अद्याप बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडत इतिहास रचला. गेल्या आठवड्यात या चित्रपटाने भारतात ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘पठाण’ने रविवारी बॉक्स ऑफिसवर ४.३० ते ४.५० कोटी रुपयांची कमाई केली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan fan threat of file fir against him actor funny reply here mrj
First published on: 20-02-2023 at 20:58 IST