बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. पठाणनंतर शाहरुख आता ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी त्याला चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा- “तो मला खूप…”; नवाजुद्दिनच्या पत्नीने केला ‘मिस्ट्री मॅन’बरोबरच्या नात्याचा खुलासा, म्हणाली…

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला ट्विटरवर एका नेटकऱ्याने ‘आस्क एसआरके’ सेक्शनमध्ये एका चाहत्याने विचारलं की, तुमच्याकडे नेहमी फक्त १५ मिनिटे का असतात? गौरी वहिनी तुमच्याकडून सगळी कामे करून घेतात का?’ नेटकऱ्याच्या या प्रश्नाला शाहरुखने भन्नाट उत्तर दिलं आहे. शाहरुख म्हणाला, ” ‘बेटा, तुझी गोष्ट सांगू नकोस. जा घर स्वच्छ कर.” शाहरुखच्या या भन्नाट उत्तरावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केली आहे.

दरम्यान, शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखबरोबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसेल, असं बोललं जात आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.