Dunki Drop 1: किंग खान शाहरुख खान हा त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहमीप्रमाणे रात्री १२ नंतर शाहरुखच्या चाहत्यांनी त्याचे घर ‘मन्नत’बाहेर जमून आपल्या लाडक्या किंग खानला शुभेच्छा दिल्या. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. शाहरुखनेही घराबाहेर येऊन सगळ्यांचे आभार मानले. आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त तो त्याच्या चाहत्यांना एक मोठं सरप्राइज देणार अशी चर्चा होती.

मीडिया रीपोर्टनुसार शाहरुखच्या ‘डंकी’चा टीझर आज येणार अशी चर्चा होती. आता नुकतंच शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट करत चाहत्यांना वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. शाहरुखने ‘डंकी’चा टीझर शेअर करत चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला. शाहरुखचे चाहते गेल्या बऱ्याच महिन्यांपासून या चित्रपटाच्या टीझरची वाट पहात होते, अखेर तो टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आणखी वाचा : “जवान प्रदर्शित करा, नाहीतर…” वाढदिवशी शाहरुख खानने नेटफ्लिक्सला धरलं वेठीस; व्हिडीओ चर्चेत

‘डंकी’च्या टीझरची सुरुवात एका सुमधुर गाण्याने होते आणि एक वेगळाच ट्विस्ट प्रेक्षकांच्या समोर येतो. याबरोबरच चित्रपटात शाहरुखचं पात्र, त्याचं कुटुंब, चार मित्र आणि त्यांचे लंडनला जायचे स्वप्न याबद्दल आपल्याला समजतं. या टीझरमध्ये शाहरुख कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती खेळताना दिसत आहे तर त्याचा एक अनोखा विनोदी अंदाजही समोर आला आहे. या टीझरमध्ये केवळ शाहरुखचं पात्र हार्डी, तापसी पन्नूचं पात्र मनू आणि विकी कौशलचं पात्र सुखी यांची तोंडओळख करून देण्यात आली आहे. टीझरवरुन या चित्रपटातून गंभीर विषयाची विनोदी पद्धतीने मांडणी केल्याचं स्पष्ट होत आहे. याचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा टीझर शेअर करताना शाहरुख लिहितो, “ही साध्या, सरळ व खऱ्या लोकांच्या स्वप्नपूर्तीची कहाणी आहे. त्यांची मैत्री, त्यांच्यातील प्रेम आणि एकमेकांना धरून राहण्याची त्यांची वृत्ती याची ही गोष्ट आहे. या चित्रपटाशी जोडला जाणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” शाहरुख खानचा ‘डंकी’ नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी प्रभासचा ‘सलार’सुद्धा येणार आहे. यादिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे.