बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने ‘जवान’ व ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांतून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हे वर्षं शाहरुखसाठी फार खास आहे कारण या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांपाठोपाठ किंग खानचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ या चित्रपटाची गेले काही दिवस चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील दोन गाणी अन् एक छोटा टीझर आल्यापासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या पोस्टरवर रणबीर ऐवजी स्वतःच्या चेहेरा वापरल्याने राम गोपाल वर्मा झाले ट्रोल; म्हणाले, “माझ्यातील या…”

काहीच दिवसांपूर्वी याचा ट्रेलर आणि यातील आणखी दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सध्या शाहरुख खान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड मेहनत घेत असताना दिसत आहे. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खानने वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख काही पोलिस अधिकारी आणि आपली सेक्रेटरी पूजा ददलानीसह वैष्णोदेवीच्या मंदिराच्या परिसरात पाहायला मिळत आहे. तिथे शाहरुखला पाहून लोकांची झुंबड उडून इतरांची गैरसोय होऊ नये यासाठी त्याने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे ज्यामध्ये त्याचा चेहेरादेखील कोणाला सहज पाहता येत नाहीये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डंकी’ला चांगले याश मिळावे यासाठी किंग खानने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले असून प्रार्थना केली आहे. ‘डंकी’च्या बरोबरीनेच प्रभासचा ‘सालार’देखील प्रदर्शित होणार असल्याने ‘डंकी’चे निर्माते प्रदर्शनाची तारीख पुढे नेणार असल्याची चर्चा होती, परंतु त्यावरही राजकुमार हिरानी यांनी पूर्णविराम दिला आहे. किंग खानचा ‘डंकी’ २१ डिसेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे तर प्रभासचा ‘सालार’ हा २२ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा या वर्षअखेरीस बॉक्स ऑफिसवर साऊथ विरुद्ध बॉलिवूड हा मुकाबला पाहायला मिळणार आहे.