scorecardresearch

शाहरुखच्या चाहत्याची कमाल; ‘पठाण’साठी अपंग मित्राला पाठीवर घेत गाठलं दुसरं राज्य

या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून २८२ कोटी तर जगभरातून ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.

srk pathaan
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान पठाण चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे आता या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सर्वच शोज हाऊसफुल होताना दिसत आहेत. या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट त्याचे चाहते एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करत आहेत. शाहरुखचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याची प्रचिती आली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याचा एक चाहता चक्क मित्राला पाठीवर घेऊन चित्रपट बघण्यासाठी आला होता.

शाहरुखचे चाहते आज जगभरात आहेत. त्याच्या वाढदिवसाला घराबाहेर गर्दी करत असतात. असाच एक चाहता पठाण चित्रपट बघण्यासाठी आपल्या अपंग मित्राला पाठीवर घेऊन थेट बिहार वरून पश्चिम बंगालला आला होता. एकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे दोघे बिहारमधील भागलपूरचे असून पश्चिम बंगालमधील मालदा येथे चित्रपट बघण्यासाठी आले.

Photos : बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक करणाऱ्या किंग खानने ‘हे’ फ्लॉप चित्रपटदेखील दिलेत

पठाण चित्रपटाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून २८२ कोटी तर जगभरातून ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. शाहरुख खानबद्दल प्रेम दर्शवण्यासाठी अनेकांनी ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण चित्रपटगृहचं बुक केलं होतं. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ आणि ‘झुमे जो पठाण’ ही गाणी सुरू झाली की चित्रपटगृहांमध्ये लोक नाचायला लागली होती तसेच एकाने नोटादेखील उडवल्या अशा घटना घडत आहेत.

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:15 IST