Ganesh Chaturthi Special Sharvari Wagh Shared A Post : सध्या सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त जिकडे-तिकडे आनंददायी वातावरण निर्माण झालं आहे. अनेक जण गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या गावी गेले आहेत. काही कलाकार मंडळीदेखील गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या गावी गेल्याचं सोशल मीडियावरील फोटोंमधून पाहायला मिळतं. अशातच बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघसुद्धा तिच्या गावी गेली आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त शर्वरी वाघ तिच्या गावी गेली असून अभिनेत्रीनं नुकतेच तेथील काही फोटो शेअऱ केले आहेत. शर्वरी दोन दिवसांपूर्वीच गावी गेल्याचं तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवरून पाहायला मिळतं. शर्वरी ही मूळची पुण्याजवळील मोरगाव येथील आहे. गणेशोत्सवानिमित्त ती दरवर्षी तिच्या गावी जाते. याबाबत तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

शर्वरी वाघने गणेश चतुर्थीनिमित्त दिल्या शुभेच्छा

शर्वरीने आज गणेश चतुर्थीनिमित्त काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिनं ‘बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! संपूर्ण वर्षातील माझा हा आवडता काळ आहे. तुमचाही दिवस आनंददायी जावो. खूप प्रेम आणि खूप मोदक खा’, अशी कॅप्शन दिली आहे.

शर्वरीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती, तिची आई व तिची बहीण कस्तुरी वाघ पाहायला मिळत आहे. शर्वरी दरवर्षी गणेशोत्सवाच्या वेळी तिच्या आई व बहिणीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तिनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती तिच्या गावच्या घरी गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे.

शर्वरीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या गावच्या घरातील झलक पाहायला मिळत आहे. गावाकडील तिचं घर खूप मोठं व जुन्यापद्धतीचं असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तिच्या घरातील फोटो लक्ष वेधून घेतात.

शर्वरीनं शेअर केलेल्या या फोटोंखाली अनेकांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकरनंही तिच्या पोस्टखाली ‘गोड’, अशी कमेंट केली आहे. तिच्यासह अनेकांनी ‘सुंदर’, ‘खूप छान’, ‘गणपती बाप्पा मोरया’, अशा कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, शर्वरीबद्दल बोलायचं झालं तर, ती तिच्या ‘मुंज्या’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. त्यासह तिने ‘महाराज’, ‘वेदा’ या चित्रपटांतही काम केलं आहे. लवकरच ती आलिया भट्टसह ‘अल्फा’ या चित्रपटातून झळकणार आहे. त्यानंतर ती लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटातून अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यासह झळकणार आहे. त्यामध्ये अभिनेता वेदांग रायनाही झळकणार आहे.