अभिनेते व होस्ट शेखर सुमन सध्या चिंतेत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या बहिणीचे पती गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता आहे. शेखर सुमन यांच्या भावोजींचं नाव संजय कुमार असून ते बिहारची राजधानी पाटण्यातून बेपत्ता झाले आहेत. ते एनएमसीएचमध्ये डॉक्टर होते. भावोजींचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरल्याने शेखर सुमन यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

अनन्या पांडेशी अफेअरच्या चर्चा; लग्नाबद्दल विचारलं असता आदित्य रॉय कपूर म्हणाला, “मला…”

शेखर सुमन म्हणाले की, “संजय कुमार इतके साधे डॉक्टर होते की त्यांचा कोणी शत्रूही नव्हता. त्यांना कशाचंही टेन्शन नव्हतं, त्यामुळे ते आत्महत्या करू शकत नाहीत. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव हा यामागचा सर्वात मोठा निष्काळजीपणा आहे. एवढ्या मोठ्या पुलावर एकही सीसीटीव्ही नाही. सीसीटीव्ही असता तर ओव्हर ब्रिजवर संजयबरोबर काय झालं, हे सर्व काही कळालं असतं.”

दीपिका कक्करचं पहिलं लग्न का मोडलं होतं? घटस्फोटानंतर अभिनेत्रीने शोएब इब्राहिमशी धर्म बदलून केलेला विवाह

पुढे शेखर सुमन म्हणाले की, “मी यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्याचा प्रयत्न करेन. मी त्यांना सांगेन की पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जेणेकरून माझ्या भावोजींना शोधता येईल. जर पोलीस या प्रकरणाचा तपास करू शकत नसतील, तर मी हात जोडून विनंती करतो की, सीबीआय या संस्थेला यात सहभागी करून घ्यावे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जावा अशी माझी इच्छा आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पती अचानक गायब झाल्यामुळे त्यांच्या बहिणीची प्रकृती खूपच वाईट आहे, असंही त्यांनी सांगितलं. “काल रात्री जेव्हा मी माझ्या बहिणीला भेटलो तेव्हा ती मला मिठी मारून रडू लागली. रडत रडत बहीण म्हणू लागली की माझ्या नवऱ्याला घेऊन ये,” हे सांगताना शेखर सुमनही भावूक झाले. आपले भावोजी संजय कुमार यांना शोधण्याची विनंती शेखर सुमन बिहार सरकार आणि पोलिसांना विनंती केली.