बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढवत आहे. भाजपाने हिमाचल प्रदेशमधील मंडी इथून कंगनाला उमेदवारी दिली आहे. कंगना सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. अशातच तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या व कंगनाच्या तुटलेल्या नात्याबद्दल विधान केलं आहे. आपल्या मुलाबरोबर कंगना खूप आनंदी होती, असं शेखर सुमन म्हणाले आहेत.

प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन व कंगना रणौत एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. “आपण सर्वजण आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो. जे आज बरोबर दिसतंय ते उद्या बरोबर दिसेलच असं नाही, त्याउलटही घडतं. खरंतर कोणालाच रिलेशनशिप, ब्रेकअप आणि नंतर त्यातून सावरत पुढे जावं असं वाटत नाही. प्रत्येक जोडप्याला आपलं नातं कायमस्वरुपी, घट्ट व पवित्र असावं असं वाटतं,” असं एका मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले.

Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर

ते पुढे म्हणाले, “नियतीच्या मनात जे असतं ते घडतं आणि तुम्हाला त्याचं पालन करावं लागतं. कंगना आणि अध्ययन एकत्र असताना खूप आनंदी होते, पण नंतर ते वेगळे झाले आणि आपापल्या आयुष्यात पुढे गेले. जे व्हायचं होतं ते झालं. त्यामुळे आता त्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल वाईट भावना नाहीत. कधीकधी परिस्थितीमुळे काही गोष्टी घडतात पण त्याकडे वळून बघताना प्रेमाने पाहायला पाहिजे.”

“ते आधीच विवाहित होते,” लग्न गुपित ठेवण्याबद्दल अरुणा इराणींचा खुलासा; मूल होऊ न देण्याबाबत म्हणाल्या, “तो निर्णय…”

“आम्ही कुटुंबीय व अध्ययन या गोष्टी मागे सोडून आयुष्यात पुढे गेले आहोत. त्यांच्या आयुष्यातील हा एक टप्पा होता. त्यावर बोलणारे आम्ही कोण? सगळे आपापल्या मार्गाने गेले आहेत आणि प्रत्येकजण आपला आनंद आणि समाधानासाठी काम करत आहे. मागे फिरणं किंवा घडून गेलेल्या गोष्टींबद्दल आता एकमेकांकडे बोट दाखवून ‘हे बरोबर आहे’ किंवा ‘हे चुकीचं आहे’ असं म्हणण्यात काही अर्थ नाही,” असं शेखर सुमन म्हणाले.

राज कपूर अभिनेत्रीला मांडीवर बसवून सीन समजावून सांगायचे, ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांचा खुलासा

कंगना व अध्ययन यांनी एकमेकांना २००८ मध्ये डेट केलं होतं. पण काही काळांनी त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपनंतर बऱ्याच वर्षांनी २०१६ मध्ये अध्ययन सुमनने डीएनएला एका मुलाखतीत म्हटलं होतं की कंगनाने त्याच्यावर काळी जादू केली होती.