Shraddha Kapoor Confirms Being in Relationship: अभिनेते शक्ती कपूर यांची लाडकी लेक प्रेमात आहे. ‘स्त्री २’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचं यश साजरं करणाऱ्या श्रद्धा कपूरने वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. श्रद्धाने ती रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे. मात्र तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा केला नाही. श्रद्धा बॉयफ्रेंडबरोबर वेळ कसा घालवते त्याबद्दल तिने सांगितलं.

कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा म्हणाली, “जोपर्यंत माझ्याजवळ तो आहे, तोपर्यंत मला इतर कोणाचीही गरज नाही.” श्रद्धा कपूर तिच्या जोडीदाराबरोबर कसा वेळ घालवते, याबाबत तिने सांगितलं. “मला त्याच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो. मला त्याच्याबरोबर चित्रपट पाहणे, जेवायला जाणे किंवा प्रवास करणे खूप आवडते. मी अशी व्यक्ती आहे जिला या गोष्टी एकत्र करायला आवडतात, तसेच काहीच न करता घरीच वेळ घालवायलाही आवडतं.”

हेही वाचा – सूर जुळले…! म्हणत कोकण हार्टेड गर्लने अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा, नावही आलं समोर

ती पुढे म्हणाली, “उदारहणार्थ, मी जर माझ्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटले नाही, तर त्याचा माझ्या मूडवर परिणाम होतो. काल, आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र जेवायला गेलो होतो. आम्ही छान वेळ घालवला, या गोष्टी माझ्यासाठी नातेसंबंधातही महत्त्वाच्या आहेत.”

लग्नाबद्दल मत विचारलं असता श्रद्धा कपूर म्हणाली, “लग्नावर विश्वास ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा प्रश्नच नाही, तर ज्या व्यक्तीशी लग्न करायचंय ती योग्य व्यक्ती असण्याचा प्रश्न आहे. जर एखाद्याला वाटत असेल की त्याला लग्न करायचं आहे, तर तेही छान आहे, तसेच एखाद्याला लग्न करावं वाटत नसेल तर तेही छान आहे.”

हेही वाचा – “माझे आई-वडील जलसामध्ये राहतात, मी…”, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर राहत नाही अभिषेक बच्चन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रद्धा कपूर स्क्रीनरायटर राहुल मोदीला डेट करत असल्याची चर्चा आहे. ते दोघे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या जामनगरमधील प्री-वेडिंगसाठी एकत्र गेले होते. तसेच अनेकदा श्रद्धा राहुलबरोबरचे फोटो स्टोरीला पोस्ट करून हटके कॅप्शन देत असते.